भुईमूगाचे प्रचलित जाती
भुईमूगाचे प्रचलित जाती ♥प्रगतशील शेतकरी♥
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
♥महाराष्ट्रा भुईमूग प्रामुख्याने खरीप हंगामात घेतला जात असला
तरी उन्हाळी हंगामात मिळणारा भरपूर सुर्यप्रकाश,
पिकाच्या वाढीच्या काळात वेळच्या वेळी पाणी व किडीचे कमी प्रमाण
यामुळे खरीप पिकापेक्षा उन्हाळी भुईमूगाचे उत्पादन दीड ते दुप्पट येते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥भुईमूग हे द्विदल गटातील शेंगवर्गीय तेलबिया पीक आहे.
♥वाढीच्या पद्धतीनुसार त्याचे
उपट्या,
निमपसऱ्या आणि
पसऱ्या असे तीन प्रकार पडतात.
♥तर वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या त्याचे
स्पॅनिश,
व्हेलेशिया आणि
व्हर्जिनिया असे तीन वर्ग पडतात.
♥स्पॅनिश व व्हेलेशिया हे दोन्ही उपट्या वर्गात मोडतात.
♥तर व्हर्जिनियाचे निमपसऱ्या व पसऱ्या असे वाढीचे दोन वर्ग आहेत.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥महाराष्ट्रातील भुईमूगाचे प्रचलित जातीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
♥ स्पॅनिश - उपट्या एस - बी -११
♥ व्हेलेशिया - उपट्या कोपरगाव - ३
♥ व्हर्जिनिया- निमपसऱ्या - कोपरगाव - १
व्हर्जिनिया- निमपसऱ्या - यु. एफ.७० -१०३
व्हर्जिनिया- निमपसऱ्या - टी.एम.व्ही. -१०
♥ व्हर्जिनिया - पसऱ्या एम- १३
♥भुईमुगाचा ए. के. १५९ हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी प्रसारित केला आहे.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, भूषण खैरनार 09422895411)
संकलित!
Comments
Post a Comment