आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती श्रावणी सोमवारचे व्रत
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला
अर्पण करण्याची वृत्ती श्रावणी सोमवारचे व्रत♥प्रगतशील शेतकरी♥
देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ दिली जाते.
पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवमूठ वाहिली जाते ,
दुसर्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवमूठ वाहिली जाते ,
तिसर्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवमूठ वाहिली जाते ,
चौथ्या श्रावणी सोमवारी जवस शिवमूठ वाहिली जाते आणि
पाचवा श्रावणी सोमवार असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते.
शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
Comments
Post a Comment