केशर लागवड नियोजन करण्यापुर्वी
केशर लागवड नियोजन करण्यापुर्वी ♥प्रगतशील शेतकरी♥
♥केशराच्या लागवडीची जमन उताराची असावी लागते.
♥केशराचे कंद तीन वर्षांचे झाले म्हणजे ते दुसरीकडे तयार केलेल्या चौकोनी वाफ्यांत दोन दोन हातांच्या अंतरावर लावतात.
♥ज्या वाफ्यांत केशराची लागवड करावयाची असेल तो सुमारें आठ वर्षे पडीत ठेवावा लागतो. या वाफ्यांत पाणी किंवा खत देत नाहींत.
♥एकदां कंद लाविले असतां ते १४ वर्षेपर्यंत टिकतात. कंदांची लागवड जुलै किंवा आगस्ट महिन्यांत करतात.
♥लागवड करतांना जमीन थोडी भुसभुशीत करून तिला चोहोंबाजूंनीं पाणी चांगलें निचरून जाण्याकरितां चर खणावा लागतो.
♥आक्टोबर महिन्यांत केशराच्या झाडांनां जांभळीं फुलें येतात व त्यांचा सुगंध फार गोड व आल्हादकारक असतो.
♥फुलें गोळा करून झाल्यावर त्यांपासून केशर तयार केलें जातें.
♥ झाफ्रन केशर~ पहिल्या प्रतीचें केशर
फुलें उन्हांत वाळवितात व त्यांमधील प्रत्येक फुलाचे तीन स्त्रीकेसराग्र काढून घेतात. यांपासून निघालेल्या केशराला शाही झाफ्रन हें नांव आहे.
हें केशर पहिल्या प्रतीचें असतें.
♥मोंगला केशर ~ दुय्यम प्रतीचें केशर
स्त्रीकेसराग्र काढून घेतल्यावर बाकी राहिलेल्या पांढर्या तंतूपासून 'मोंगला' नांवाचें हलकें केशर काढतात.
मोंगला केशराचा भाव सामान्यतः तोळ्यास प्रमाणे असतो.
♥ लाचा केशर ~ हलक्या प्रतीचें केशर
मोंगला केशर काढून घेतल्यानंतर वाळलेली फुलें हळूच काठीनें ठोकतात.
हीं ठोकलेलीं फुलें सर्व पाण्यांत टाकतात.
यामधील फुलांचा उत्तम भाग बुडाशीं जाऊन बसतो.
त्याला निवळ म्हणतात. तरंगत राहिलेला फुलांचा भाग फिरून ठोकतात व पुन: पाण्यांत टाकतात.
अशा रीतीनें बुडाशी राहिलेली निवळ एके ठिकाणीं करतात.
यापासून केलेलें केशर हलकें असतें.
याला `लाचा’ असें म्हणतात.
♥ केशराचा व्यापार
केशर तयार झाल्यावर तें काश्मीरमधून अमृतसर व इतर व्यापाराच्या ठिकाणीं पाठविलें जातें.
केशराचा पुष्कळसा व्यापार फ्रान्स व मुंबई यांमध्यें चालतो. हाँगकाँग व अरेबियामधील बंदरें यांमध्यें हिंदुस्थानांतून केशराची पुनर्निर्गत होते.
याचें झाड लहान असून याचे कंद असतात. त्यास लॅटिनमध्यें ओकस साटिवस, इंग्रजींत सॅफ्रन, मराठींत व संस्कृतमध्यें केशर, कुंकुम इत्यादि नांवें आहेत.
काश्मीरमधील पामपूर प्रदेशांत याची लागवड फार प्राचीन काळापासून होत आहे. पूर्वी केशराच्या पिकावर त्या संस्थानाचा पूर्ण हक्क होता.
भावप्रकाशामध्यें या झाडाला कुंकुम म्हटलेलें आहे. यावरून काश्मीरांत किती प्राचीन काळापासून याचा व्यापार होता याची कल्पना सहज करतां येईल. बाबर व जहांगीर यांच्या वेळच्या लेखांतूनहि काश्मीरमधील केशरासंबंधीं उल्लेख केलेला आढळतो.
♥ केशराचा उपयोग
केशराचा मुख्य उपयोग म्हणजे त्याच्यापासून होणारा रंग होय.
याचा पक्वान्नांत उपयोग करतात.
केशरास फार किंमत पडत असल्यामुळें तें क्वचित् प्रसंगीं वापरलें जातें.
मंगलप्रसंगीं याचा रंग शुभ समजतात.
यूरोपखंडांत यापासून `सॅफ्रन केक्स’ (केशराच्या वड्या) तयार करतात.
केशराचा रंग तांबूस असून तंतू लांब असले म्हणजे तें उत्तम प्रतीचें केशर समजलें जातें.
केशर ९ वर्षांवर राहिलें म्हणजे बिघडावयास लागतें.
केशर सुवासिक असून रंगास व औषधाकरितां उपयोगी पडतें.
याच्या गंधाकरितां गाळ्याहि करतात.
संकलित!
Comments
Post a Comment