कंद किड व रोग नियंत्रण
कीड
खोडमाशी:- हि माशी खोडावर उपद्रव करते. या माशीच्या नियंत्रणासाठी १०० मि. ली. कोणतेही कीटकनाशक १०० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
कंदमाशी:- या माशीच्या नियंत्रणासाठी १० दाणेदार फोरेट, हेक्टरी 20 किलो टाकतात.
उन्नी (हुमणी):- या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास जमिनीत आले लावताच १० टक्के बी. एच. सी. ५० किलो हेक्टरी प्रमाण खताबरोबर मिसळावी. तसेच बी. एच. सी. बरोबर ५०० किलो निम पेंड दिली तर कीड नियंत्रण होऊन पिकाला खतही मिळते.
रोग
नरम
कंद कूज नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
कंद कूज कारण
♥जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
♥शेंड्याकडून झाड वाळत जाते.
♥बुंध्याच्या भाग सडल्यामुळे सहज उपटला जाऊ शकतो.
♥त्यानंतर जमिनीतील गाठे सडण्यास सुरुवात होते.
----------------------------------------------------------------------
कंद कूज उपाय -
१. रोगट झाडे समूळ उपटून नष्ट करावी.
२. लावणीपूर्वी व नंतर दर महिन्यास जमिनीवर व पिकावर ५:५:५० चे बोर्डोमिश्रण फवारावे.
३. पिकाचा फेरपालट, उत्तम निचरा होणार्या जमिनीत लागवड अत्यावश्यक.
(वरिल शिफारस स्व-जबाबदारिवर वापरावी !)
संकलित!
Comments
Post a Comment