सोडायला शिकलं कि मग पहा
सोडायला शिकलं कि मग पहा
_ सूंदर लेख
माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
*गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.*
मला विचारलच नाही
मला Good morning केले नाही
मला निमंत्रणच दिलं नाही
माझं नावंच घेतलं नाही
माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत
माझा फोन घेतला नाहीं
मला बसायला खुर्चीच दिली नाही
मला मानच दिला नाही
सोडुन द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा,
निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.*
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं.
तो लगेच सोडता येणार नाही. पण कठिणही नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे. लक्षात ठेवा एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या मनातून कायमचे उतरता.
खास सर्वांना
Comments
Post a Comment