शेततळ्याचे बाष्पीभवन (Evaporation) टाळण्यासाठी उपाय
शेततळ्याचे बाष्पीभवन (Evaporation) टाळण्यासाठी उपाय♥प्रगतशील शेतकरी ग्रुप♥
♥पाण्याचा बराच मोठा हिस्सा जर उन्हाने उडून जात असेल तर आगामी काळामध्ये पाण्याच्या नियोजनात हे बाष्पीभवन कमी कसे होईल, यावर सर्वाधिक भर दिला गेला पाहिजे.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेमध्ये जमिनीवर पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जसा जिरवण्यावर भर दिला जातो तसाच भर येत्या काही वर्षांमध्ये पडलेला एकही थेंब उन्हाने किंवा वार्याने बाष्पीभवन होऊन उडून जाणार नाही यावर द्यावा लागणार आहे.
♥साठवलेल्या पाण्यावर काही विशिष्ट तेलांचे तवंग सोडल्यास त्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
शेततळी बांधणार्या शेतकर्यांनी अशा तेलाचा वापर करायला हरकत नाही.
♥आपण शेतामध्ये विशेषत: बागांना पाणी देतो.
तेव्हा दोन झाडांच्या मधल्या भागातील जमीन तापते आणि तिच्यामुळे सुद्धा पाण्याचे बाष्पीभवन होते.
त्यामुळे बागा किंवा अन्य शक्य असेल त्या पिकांमध्ये जमीन तापू नये याकरिता आच्छादन टाकण्याची कल्पना पुढे आलेली आहे.
शेतामध्ये वाया जाणारे गवत, काडी कचरा किंवा उसाचे पाचट यांचा वापर अशा आच्छादनासाठी करता येऊ शकतो.
त्यातून आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकतो.
♥आपल्याला पाणी कमावणे शक्य नाही. निदान ते कमीत कमी गमवावे म्हणजे ते कमावल्यासारखेच आहे.
ते कमावण्याचा एक मार्ग म्हणजे हे आच्छादन.
पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी आणखी एक उपाय करता येतो.
♥आपल्या शेतामध्ये वारा कोणत्या दिशेने वाहतो हे बघून वार्याच्या दिशेला बांधावर झाडे लावली तर त्या झाडांमुळे एक संरक्षक भिंत उभी राहते आणि वारे अडवले जाऊन, वार्यामुळे होऊ पाहणारे बाष्पीभवन टाळण्यास मदत होते.
संकलित!
Comments
Post a Comment