दीर्घकाळ उत्पादन देणारा कल्पवृक्ष ‘चिंच’
♥दीर्घकाळ उत्पादन देणारा कल्पवृक्ष ‘ चिंच ’ ♥प्रगतशील शेतकरी♥
♥पूर्वजांना भविष्यातील गरजेची दूरदृष्टी होती.
त्यामुळे त्यांनी वर्षानुवष्रे उत्पादन देणारी व कमी पाण्यामध्ये स्वत: जीवंत राहत पर्यावरणाचा समतोल राखणारी चिंचेची झाडे लावली होती.
♥पूर्वजांना भविष्यातील गरजेची दूरदृष्टी होती. त्यामुळे त्यांनी वर्षानुवष्रे उत्पादन देणारी व कमी पाण्यामध्ये स्वत: जीवंत राहत पर्यावरणाचा समतोल राखणारी चिंचेची झाडे लावली होती.
मात्र, आता ही चिंचेची झाडे बेसुमार तोडीमुळे दुर्मीळ होताना दिसत आहेत.
♥चिंच हे कोरडवाहू फळझाडांमधील एक महत्त्वाचे पीक आहे.
चिंचेची उगवण नैसर्गिकरीत्या होते. ही झाडे सदाहरित, सदा पल्लवित असल्याची पाहावयास मिळतात.
अजूनही २५० वर्षापूर्वीची चिंचेची झाडे पाहावयास मिळतात. त्यामुळे कायमस्वरूपी व वर्षानुवर्षे फळे देणारे झाड म्हणून चिंचेच्या झाडाकडे पाहिले जाते.
♥अलीकडच्या काळात चिंच किंवा चिंचेपासून बनवलेल्या पदार्थाना परदेशात मागणी वाढत आहे.
भारतामध्येही यासाठी मोठी मागणी आहे.
त्यामुळे अंतर्गत बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठी भरपूर मागणी आहे.
भारतातून आखाती भागात चिंचेची निर्यात होते.
मागणी वाढत असल्याने चिंच या फळझाडाची लागवड करणे व्यापारी दृष्टीने हिताचे ठरणारे आहे.
♥अत्यंत हलक्या जमिनीत, माळरानामध्ये, डोंगरउतारावर, मध्यम काळय़ा, भारी काळय़ा आणि पोयटय़ाच्या जमिनीत चिंचेची झाडे चांगली वाढून भरपूर उत्पादन देतात.
सुरुवातीला तीन ते चार वष्रे पाणी दिल्यानंतर या झाडाला पाणी देण्याची गरज भासत नाही. त्यानंतर स्वत:च हे झाड पाणी उपलब्ध करत असते. विशेष म्हणजे सर्व कसोटय़ांना चिंच झाड उतरते.
पाण्याच्या दृष्काळातही जादा फळे देणारे हे झाड आहे.
♥काही वर्षापूर्वी प्रत्येक गावात किंवा वाडय़ांमध्ये किमान एकतरी चिंचेचे जुनाट झाड दिसून येत होते.
मात्र, आता ही आकडेवारी दोन-चार गावामागे एक या प्रमाणात दिसते. पूर्वी चिंचेच्या फळांची साले काढून चिंचेचा (आंबटाचा) गोळा केला जायचा.
जेवणासाठी त्याचा वर्षभर वापर केला जायचा.
बाजारातही या तयार केलेल्या आंबटाचे गोळे विक्रीसाठी यायचे.
चिंचेची झाडेच नष्ट झाल्याने आंबट बाजारात उपलब्ध होण्याचे प्रमाण साहजिकच कमी झाले आहे.
♥चिंचवृक्ष दुष्काळातला कल्पवृक्ष असल्याने त्याचे पालनपोषण पावसातच होते.
प्रदीर्घ काळ उत्पादन देण्याची क्षमता आहे.
बियापासून लागवड केलेली झाडे १७ वर्षानी तर कलमापासून लागवड केलेली झाडे आठ वर्षानी उत्पादन मिळवून देण्यास सुरुवात करतात.
चिंच व गर तसेच चिंचोके याला भारतभर सातत्याने मागणी असल्याने उत्तम अर्थार्जन देणारे झाड म्हणून पाहिले जाते.
♥चिंचेपासूनचे प्रक्रियायुक्त पदार्थ व चिंचपावडर याची मोठय़ा प्रमाणात निर्यात होते.
चिंचेचे लाकूड इमारत बांधकाम, फर्निचर, शेती औजाराला उपयुक्त ठरते.
वाढत्या वयोमानानुसार चिंचेच्या फळधारणेत वाढ होते.
चिंचगुळाची आमटी, चिंचेचे सार, चिंचेची गोळी, आर्क इत्यादी जीवनोपयीगी पदार्थ बनवले जातात.
Comments
Post a Comment