मिरची व्यवस्थापन
मिरची व्यवस्थापन ♥प्रगतशील शेतकरी♥
♥मिरचीसाठी विद्यापिठाने फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सुर्यमुखी या जाती(सुधारीत जाती) शिफारस केल्या आहेत.
त्याशिवाय मैना (निर्मळ), नामधारी, सितारा(सेमिनीस) ह्या संकरीत जाती लावल्या जातात.
सुधारीत जातीसाठी 60X45 सेंमी व संकरीत जातीस 75X75 सेमी अंतर ठेवावे
♥रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत सुधारीत जातीस एकरी 400 ग्रॅम तर संकरीत जातीस 130 ग्रॅम बियाणे वापरावे.
♥लागणीवेळी 4-5 ट्रेलर शेणखत 350 किलो निंबोळीपेंड, 3 पोती सुपरफॉस्फेट, 1 पोते पोटॅश द्यावे.
♥युरीया 2.5(अडीच) पोते 3 हप्त्यांत विभागून द्यावा
♥त्याशिवाय झिंक, फेरस, मॅग्नीज सल्फेट प्रत्येकी 7 किलो द्यावे,
♥अँझेटोबॅक्टर, पीएसबी व ट्रायकोडर्मा प्रती एकरी 2 किलो द्यावे.
♥प्लॅनोफीक्स 30 मिली प्रती 100 लिटर पाण्यातून 20 दिवसांच्या अंतराने फवारावे.
♥ सुधारीत जातीस थोडी कमी खतमात्रा द्यावी
♥ 13.00.45 ह्या विद्राव्य खताच्या 500 ग्रॅम प्रती 100 लिटर पाण्यातून आठवड्याच्या अंतराने 5-6 फवारण्या घ्याव्यात.
♥रोगकिडीच्या प्रकारानुसार फवारण्या घ्याव्यात.
♥मिरचीच्या पानावर पांढरीमाशी, फुलकिडे, मावा, या रस शोषण करणा-या किडीच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास सदर किडीच्या नियंत्रणासाठी -
1.एन्डोसल्फान 10 मिली + अँसिफेट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी निंबोळी आर्क 5 टक्के ची फवारणी घ्यावी
2. तिसरी फवारणी एन्डोसल्फान 10 मिली + मेटासिस्टॉक्स 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे घ्यावी. त्यानंतर निंबोळी आर्कची 5 टक्के फवारणी करावी.
3. गरज पडल्यास कॉन्फीडॉर 4 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
4. मिरचीवर पावडरी मिल्ड्यू किंवा बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत असेल तर बावीस्टीन 25 ग्रॅम, किंवा एम 45, 20 ग्रॅम, डायथेन झेड78- 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून आदलून बदलून फवारणी करावी.
संकलित!
Comments
Post a Comment