आयुष्यात सकारत्मक दृष्टिकोण.. गणिताच्या माध्यमातुन

♥आयुष्याचे गणित चुकले
असे कधीच म्हणू नये .
आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,
चुकतो तो चिन्हांचा वापर...!
बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार
हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि
उत्तर मनासारखे येते.

♥आयुष्यात कुणाशी बेरीज करायची,
कुणाला केंव्हा वजा करायचे ,
कधी कुणाशी गुणाकार करायचा
आणि भागाकार करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे हे
समजले कि उत्तर मना-जोगते येते..!

♥आणि मुख्य म्हणजे
जवळचे नातेवाईक,मित्र
आप्तेष्ट यांना हातचा समजू नये ,
त्यांना कंसात घ्यावे!
कंस सोडविण्याची हातोटी
असली कि गणित
कधीच चुकत नाही ........!!

♥आपल्याला शाळेत त्रिकोण,
चौकोन, लघुकोन,
काटकोन, विशालकोन
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.
तो म्हणजे "दृष्टीकोन"

♥एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला,
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील..

♥आयुष्याचे calculation खूप वेळा केले,
पण 'सुख दुःखाचे' accounts कधी जमलेच नाही...

♥जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..
की 'आठवण' सोडून काहीच balance उरत नाही

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!