हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

♥हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

♥कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

♥झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

♥रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेवून नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी

कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

♥देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उंच पिकातून
कधी होवुनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना शोधीतोस आकाशी

♥कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी 
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!