मिरचीतील चुरडामुरडा किंवा घुबड्या रोगावर असाही उपाय असु शकतो!
मिरचीतील चुरडामुरडा किंवा घुबड्या रोगावर असाही उपाय असु शकतो!
नंदुरबार: नंदुरबारमधील एका गावात चक्क मिरचीच्या पीकावर दारू फवारणीचा प्रयोग पाहायला मिळत आहे. कोरीट गावातील शेतकरी योगेश पाटील यांच्या शेतात हा प्रयोग पाहायला मिळाला आहे. त्यांचा हा प्रयोगामुळे नंदुरबारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
नंदुरबार जिल्हा हा राज्यात मिरचीचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र या वर्षी मिरची पिकावर चुरडामुरडा आर्थात घुबडा रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. योगेश गणेश पाटील यांनी आपल्या 9 एकर शेती क्षेत्रात मिरचीची वाफा पद्धतीने लागवड केली आहे.
मात्र मिरचीवर घुबडा रोग आल्याने झाडे आकुंचन पावत आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. 9 एकर क्षेत्रात फक्त 40 क्विंटल मिरची निघाली आहे. योगेश पाटील यांनी या मिरचीला 14 वेळा रासायनिक खते व औषधांची फवारणी केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून त्यांनी चक्क मिरची पिकावर देशी दारूची फवारणी करायला सुरुवात केली आणि त्यांना आपल्या पिकावर फरक पडताना दिसून आला.
आज पर्यत हजारो रुपयाची रासायनिक आणि जैविक महागडी औषधे फवारली मात्र घुबडा रोगावर काही प्रतिबंध झाला नाही. म्हणून योगेश पाटील यांनी आपल्या शेतातील काही भागतल्या मिरचीवर 20 लीटर पाण्यात 180 मिलीलीटर देशी दारूचा (संत्रा) वापर केला. त्यामुळे त्यांना एक स्वस्त असा उपाय सापडला. दारूच्या फवारणीच्या एका पंपासाठी 60 ते 70 रुपये खर्च येतो. या मागील अर्थशास्राचा विचार केल्यास त्यांना कमीत कमी पैश्यात घुबडा रोगावर उपाय सापडला आहे.
9 एकर क्षेत्रावरील मिरचीचे पीक वाया जाणार म्हणून योगेश पाटील हे हताश झाले होते. त्यांना अनेकांनी महागडी औषधे फवारण्याचा सल्ला दिला होता. मात्र काही तरी नवीन प्रयोग म्हणून त्यांनी मिरचीवर देशी दारू फवारणी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रयोग करून पहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्यात यश आल्याचं सांगितलं.
पाटील यांच्या या प्रयोगानंतर आम्ही शास्त्रज्ञ भाऊसाहेब साळुंखे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या म्हण्यानुसार विषाणू आणि इतर रोगामुळे पिके सुप्त अवस्थेत जातात, त्यांना उत्तेजना देण्यासाठी अल्कोहोल (दारू) उपयोगी ठरू शकते. मात्र ही फवारणी करताना योग्य प्रमाणात आणि तज्ञांच्या सल्यानुसार जीब्र्यालिक असिडमध्येच वापर करायला हवा, तरच ही फवारणी करणे जरुरीचे असल्याचं त्यांनी सांगितलं.
गरज हि शोधाची जननी असते, असं म्हटलं जातं. या शोधामुळे कोण, कधी आणि कसा कसा शोध लावेल याचा नियम नाही. शेती तज्ज्ञांनी तयार केलेली कीटक नाशके घुबडा रोगावर फारशी परिणामकारक ठरताना दिसत नव्हती. मात्र देशी दारूची फवारणी केली असता सकारात्मक परिणाम जाणवत आहे. त्यामुळे घुबडा रोगावर देशी दारूचा डोस उपयुक्त ठरला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
संदर्भ ABPMaaza
सर माझ्या गुंडाळू मिरचीवर घोड्याचा अटक आला असून फवारणी चार वेळा झाल्या तरी ला जात नाही तर मला उपाय सांगा सदर मिरची एक महिन्याची आहे जातवान नवल म्हणून आहे तरी उपाय सांगा
ReplyDelete