नवीन आर्थिक वर्षात कर्जमुक्त होऊ...

शेतकरी मित्रांनो,

नवीन आर्थिक वर्षात कर्जमुक्त होऊ...

वाचा तर मग,

१. उत्पन्नाचे न्हवे तर उत्पन्न खर्चाचे उद्दीष्ट बाळगा, उत्पन्न खर्च उत्पन्नाच्या १०% वर आना.

लक्षात असू द्या, आपण एखाद्या कृषी दुकानात गेलो तर तो दुकानदार त्याचाच माल कसा सर्वोत्कृष्ट आहे व त्यानेच कसे प्रभावी Results मिळतील हे सांगेल व त्याच्याकडे असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे औषध विकेल अन काही गडबड झालीच तर दोष पावसावर किंवा परिस्थितीवर देईल पण जबाबदारी घेणार नाही त्यामुळं चुकीच्या सल्यांना बळी न पडता whatsaap, facebook ई माध्यमांचा उपयोग करून वेगवेगळया कृषी विद्यापीठातील प्राध्यापक किंवा Ph.D करणाऱ्या विध्यार्थ्यांचा सल्ला घ्यावा, कीड नियंत्रणासाठी व खतातील प्रयोगासाठी योग्य सेंद्रीय पर्याय जाणून घेऊन ते घरीच तयार करावेत.

डॉक्टर देखील वेगवेगळ्या चाचण्यांशिवाय आपल्यावर उपचार करत नाहीत मग आपणच आपल्या शेतीवर चाचण्यांविना उपचार करतो  म्हणून मातीपरिक्षण नक्कीच करा.

Facebook व Whatsapp वर प्रगतशील शेतकरी, बळीराजा, होय आम्ही शेतकरी किंवा कृषिउन्नती ई. Page किंवा ग्रुप्स असून त्यांच्या संपर्कात आल्यास फायदा होईल हे नक्की.
(टीप : सर्वच कृषी दुकानदार चूक नाहीत)

२. वाहतूक खर्च कमी करणे
आपण साधा खिळा, सुई ई. वस्तूंसाठी देखील तालुक्याला जातो. प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती वेगवेगळे जाऊन किराणा, बी-बियाणे, खत, औषध, पुस्तक, कपडे ई वस्तू बाजारात घ्यायला जातो आणि येताना चार वस्तू अनावश्यक देखील घेऊन येतो. लक्षात ठेवा, अनावश्यक ते खरेदी केल्यास आवश्यक ते विकावं लागेल (भाकर देणारी जमीनच विकावी लागेल).

आपण online shopping कंपन्यांच उदाहरण घेतलं तर लक्षात येईल कि प्रत्येकच ग्राहकाने खरेदी केलेली वस्तू ते वेगवेगळी पाठवत नाहीत, ते शहरा प्रमाने, गावा प्रमाणे वेगवेगळे गट्ठे पाठवतात व नंतर वेगवेगळं करून ग्राहकास पोहोचवतात व वाहतूक खर्च टाळतात.

जर तुम्ही वही पेन घेऊन विचार करून आकडे मांडले अन हिशोब केलाच तर लक्षात येईल कि वार्षिक खर्चाच्या २० - ३० % हा वाहतुक खर्च आहे.

३. गट शेती
इतिहासात डोकावून पाहिले तर कळेल कि सर्व शेतकरी हे अल्पभूधारक न्हवते, त्यांना क्षेत्र जास्त असल्याने व उत्पन्नाचे पर्याय मर्यादित असल्याने उत्पन्न खर्च अल्प होता. पण आता शेतकरी फक्त अल्पभूधारकच नाही तर संसर्गजन्य देखील झालाय, त्यामुळे शेजार्याने आज कांदा लावला आणि त्याला ज्यादा दर मिळाला कि आपणहि उद्या कांदा लावतो व अभ्यासा अभावी परिस्थितीला बळी पडतो...
अभ्यासपूर्ण गटशेती केल्यास उत्पन्न खर्च अर्ध्यावर येईल.

४. एकसुरी शेती टाळा
यापूर्वी घरात लागणाऱ्या सर्व खाद्य वस्तू आपण घरीच बनवत होतो किंवा गावात बनवून घेत होतो, आता आपण सर्व क्षेत्रात नगदी पीक घेतो, त्यालाही भाव मिळत नाही आणि दैनंदिन लागणाऱ्या ज्वारी, बाजरी, गहू, मिरची, मसाला, तिळ, दाळ, फळ ई. वस्तु बाजारातुन खरेदी करतो अन तिप्पट दाम मोजतो हे लक्षात देखील येत नाही, जर आपण आपल्याला लागणाऱ्या वार्षिक वस्तूंची यादी तयार केली व तत्सम पीकांना क्षेत्र आरक्षित करून उरलेल्या क्षेत्रात नगदी पीक घेतले तर खर्च वाचवून, स्वयं सिद्ध होऊ व आपला पैसा बाहेर जाण्यापासून रोखू.

असे केलेच तर उत्पन्न व वाहतूक खर्चात देखील कपात होईल.

५. गावातील शाळेकडे लक्ष द्या, दर्जा सुधारा आणि आवश्यकता पडल्यासच पाल्याला शहरात पाठवा (कॉलेज साठी)
आपण पैसे आहेत तोपर्यंत इंग्रजी माध्यमात टाकतो व नंतर पैसे संपले कि परत दुसऱ्या शाळेत, पाल्याची अवस्था ना घर का ना घाट का होते.

पाल्याकडे दैनंदिन लक्ष असू द्या, त्याचा अभ्यास घ्या, त्याला शेतीत घेऊन जात चला, रोज लुंगी डान्स, मुन्नी शीला कि जवानी शिकवण्यापेक्षा   तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या समस्याच कश्या सोडवता येतील हे शिकवा (फुल्ल जुगाडु बनवा) व इतर तत्सम कार्यक्रम दाखवणाबरोबरच शेतीवर चर्चेत सहभागी करून घ्या म्हणजे शेती हा आतबट्टयाचा व्यवसाय वाटणार नाही व राहणार नाही. तुम्ही शिकलातच ना? वही, पाटी,  सीस पेन्सिल व बियाणांची पिशवी  घेऊन तर काय फरक पडला आपलं पोरगं/पोरगी तसच शिकलं तर? फक्त शिक्षणाच्या दर्जाशी तडजोड करू नए म्हणजे मिळवलं.

आपणच आपल्या बाळाला लहानपणा पासून Globalised सवयी लावून आपलाच अनावश्यक खर्च वाढावतोय.

आणि हो महत्वाच रोजचा अभ्यास रोज घ्या.

६. आरोग्य जपा

जर थोडेसे अवतीभवति पाहिले तर असे दिसेल कि असंख्य कुटुंबांची अर्थव्यवस्था वैद्यकीय उपचारांच्या खर्चांने कोलमडली आहे, बाजारातून कमीत कमी खरेदी करणे हा मूळ मंत्र पाळला व लागणाऱ्या सर्व होता होईल तेवढ्या वस्तू जसे कि
गोडेतेल (तेलबियांपासून तेल बनवणाऱ्या आधुनिक मशीन्स बाजारात आहेत) पापड, लोणचे, मसाले, तूप, दूध, कडधान्य, धान्य (३ कि. क्षमतेची पीठ गिरणी देखील मिळते आता) ई.
गावरान वापरून पारंपारिक पदार्थांना प्राधान्य दिले तर सकस आहार शक्य आहे, अन आपोआपच वैद्यकीय खर्च कमी होईल.

योग्य अभ्यास करून पूर्ण कुटुंबाचा स्वस्तातील वैद्यकीय विमा उतरावला
तर आणीबाणीच्या प्रसंगी दुर्धर आजारात देखील कुटुंबावर कर्ज होणार नाही.

आपण जनावरं पाळतो, त्यांना चारतो का packaged food? मग आपल्यालाही कशाला हवंय?
त्यामुळे तेही टाळा, आपोआपच प्रश्न सुटतील.

सर्वात महत्वाचे म्हणजे व्यसन टाळा, आपण व्यसन केले तर आपली आर्थिक व शारीरिक हाणी होऊन निर्णय क्षमता खुंटून आपणच आपल्या पतनाला कारणीभूत ठरतो.

७. अनावश्यक दानशूरपण नको

डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि धर्मप्रसार, श्रद्धा किंवा समाजसेवा म्हणून ५ -१० हजार आपण नकळत खर्च करतो. कोणीतरी म्हणून गेलंय, "भूके पेट भजन नही होता", मग आपल्याकडेच वाणवा असताना कोणाला व कसे देणार? तरी आपण कर्ज काढून देतो, असे का?

जर करायचीच झाली तर शेतकरी मित्रांना, अनाथाश्रमाला किंवा शाळेला मदत करा.
माणसं जोडा, सारकारपेक्षा ते कामी येतात.

८.हुंडा देने नाही, घेणे नाही

परश्चिम महाराष्ट्र, कोकण ई. क्षेत्राचा आदार्श घेऊन वाटचाल केली,
हुंडा देणे व घेणे टाळले तर जमीन विक्रीस किंवा आत्महत्येस निमित्त होणार नाही.
मुलींना शिकवा म्हणजे हुंडा द्यावा लागणार नाही. तुम्हीच तुमच्या मुलाला म्हणता कि 'तू हुंडा घेणार नाहीस पण तुझ्या बहिणीला तर द्यावाच लागेल, मग तू घेतला तर काय वाईट?', आपण असेच तू तू मैं मै करणार तर सुरुवात कुठून करणार?
लिंगभेद टाळून, छोट कुटुंब सुखी कुटुंब (शिकलोय आपण बालपणीच) बनवा, निर्णय प्रक्रियेत जेष्ठांना स्थान देऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या.

९. सावकाराला बळी पडू नका

वरील बहुतांशी गोष्टी केल्यास खर्च कमी होऊन सावकाराची पायरी चढावी लागणार नाही, सावकार हे महिनेवारी व्याजावर पैसे देतात, ते घेऊन शेती करत असाल तर ती न केलेलीच बरी. वेळ पडल्यास मजुरी करा पण सावकार दूर ठेवा. सावकाराचा फास हा रझाकारी असून तो सुटण्या ऐवजी, आवळतच जातो अन आपलं दुखणं ठणकत राहत. तुम्हाला ते वेळेवर मदतीला येतात असे वाटत असेल तर तुम्ही परत चुकतायेत, ते वेळेवर मदतीला येत नाहीत तर तुमच्यावर पुन्हा पुन्हा हीच वेळ गावी म्हणून वेळेवर येतात. उसने पैसे गरजेला घेतले तर गैर नाही.

आपण बहुधा सावकारी फासात अडकून पडतो व सरकारी योजनांचा गैरफायदा घेऊन (२ लाखाची पाईपलाईन अधिकाऱ्यांना लाच देऊन १ लाखात पूर्ण करतो)  राहिलेले १ लाख वापरून सावकाराचे व्याज भरतो. हे असेच वर्षानुवर्षे चालते, तोपर्यंत सावकारी मीटर एवढे पुढे गेलेले असते कि आपल्याला काळ्या आईला विकल्याशिवाय पर्याय राहत नाही.

१०. दीर्घकालीन उपाय, तटस्थ विचारप्रणाली व चिंतन

आपण वेळ मारून नेण्यावर विश्वास बाळगतो पण एक दिवस आपण हतबल होतो. म्हणूनच आपल्या परिस्थितीला अनुसरून शेतजमीनीला अनुकूल व बाजारभाव कायम असेल अश्या वेगवेगळ्या पिकांची (कमी उत्पादन घेतल जात अशी पीकं), फळबागांचा परिपूर्ण अभ्यास (अश्या फळबागा लावा ज्यांच breed हे odd सीजन ला फळ देईल) व आडाखे बांधून शेती करावी. किती पाणी लागेल, किती आहे, काय उपाय योजना कराव्या लागतील, शेत तळे बांधावे लागेल का? गाळ काढलाय का? तुम्ही हे सर्व जाणताच, त्यामुळं जास्त लिहित नाही.

मुलांच्या १० नंतर लागणाऱ्या शिक्षण खर्चाची तयारी करून ठेवण्यासाठी बचत करून ठेवा.

आपण social media वर वर्तमानपत्रात दिल्लीहुन आलेल्या सर्व मुद्द्यांवर, जातिभेदावर, धर्मभेदावर, क्रिकेटवर, गुन्हेगारी ई. सर्व विषयावर देशातील सर्वात विद्वान आहोत असे समजून मते मांडत फिरतो व आपली प्राथमिकता काय, आपण करतो काय, आपली प्रश्न कोणते हे सर्व विसरतो. म्हणूनच माझी विनंती आहे कि फावल्या वेळात जर करमतच नसेल तर ते करा, पण नाही! आपण फावल्या वेळात शेती आणि दैनंदिन राष्ट्रीय मुद्दे व क्रिकेट करत बसतो.

आलेल्या प्रत्येक बातमी वर तठस्थपणे वाचन, विचार आणि चिंतन करून ठरवावे कि यात माझ्यासाठी, माझ्या गावासाठी काय आहे...

संकलित

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!