पपई खतांचे व पाण्याचे काटेकोर नियोजन असे करावे

पपई खतांचे व
पाण्याचे काटेकोर नियोजन असे करावे ♥प्रगतशील शेतकरी♥

♥पपई शेतीत खत व्यवस्थापनाला विशेष महत्त्व दिले आहे.

♥मुळाच्या चांगल्या वाढीसाठी सुरवातीलाच तीन लिटर ह्युमिक ऍसिडचा वापर करावा.

♥पपई लागवडीच्या तीन महिन्यांनंतर ठिबकमधून 19:19:19 दहा किलो,
पपईची गरजेनुसार झिंक, 13:40:13,
सी वीड एक्‍स्ट्रॅक्‍ट याची एकत्रित फवारणी करावी.

♥दुसऱ्या आठवड्यात बुरशीनाशकाची फवारणी करावी.

♥सोबतीला सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस, झिंक यांची फवारणी करावी.

♥ फवारणीनंतर ठिबकमधून 17:44:00 व 0:52:34 एक पोती खते देण्यात यावी.

♥ठिबकमधून खतासोबतच वरखतेही देण्यात यावी.

♥रोगासाठी प्रतिबंधात्मक फवारण्यांवर भर देण्यात यावा.

♥निंबोळी अर्काचा वापर करण्यात यावा.

♥ पपई बागेच्या गरजेप्रमाणे खतांचे नियोजन वेळापत्रक तयार करा.

♥त्या नियोजनानुसार खताचे व्यवस्थापन करावे.

♥योग्य व्यवस्थापनामुळेच त्यांची पपईची बाग माळरानावरही चांगलीच बहरली आहे.

♥भरपूर उत्पादन देणारे पपईचे बरेच वाण भारतात लागवडीकरिता उपलब्ध आहेत. त्यापैकी तैवान या पपईचे संकरीत वाणातील पपईची झाडे खताला उत्तम प्रतिसाद देतात. तैवान पपईचा कालावधी किमान १८ ते १९ महिने असून ते किमान ८ ते १० महिने फळ देत असते.
त्यामुळे विक्रमी उत्पादनसाठी या वाणाला १ ते २ वेळा खत देण्याऐवजी खतांची मात्रा सतत देण आवश्यक असते.

♥ यामुळे पपईला रासायनिक तसेच गावखते, सेंद्रिय खते, केव्हा व किती प्रमाणात द्यावीत याविषयी शेतकऱ्यांना योग्य माहिती असणे अतंत्य आवश्यक आहे.

♥खत आणि पाणी व्यवस्थापनासाठी लागवडीअगोदर माती तसेच पाण्याचे परिक्षण करून घेणे आवश्यक असते.
परिक्षणाच्या निकालावरून खत आणि पाण्याचे नियोजन करावे.

♥पपईला दिल्या जाणारया पाण्याची इलेक्ट्रिक कंडक्टीविटी १ ते १.५ पेक्षा कमी असणे आवश्यक अत्यंत असते, ती यापेक्षा जास्त असल्यास ते पाणी पपई लागवडीसाठी निरुपयोगी आहे असे समजावे.

♥जमिनीच्या दर्जा पाहून सेंद्रिय खतमात्रा वापरणे जरुरीचे आहे. मध्यम प्रतीच्या जमिनीत पपई पीक घेण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, गावखत तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणे जरुरीचे आहे.
खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो, निचरा उत्तम राहतो आणि जमिनीची पाणीधारणक्षमता वाढते.

गावखत व तलावातील गाळ : मध्यम खोल साधारण जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी ३० बैलगाड्या आणि त्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी २० बैलगाड्या असे चार वेळा गावखत आणि गाळ जमिनीत टाकावा. भारी व खोल जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी २० बैलगाड्या आणि पुढे प्रत्येक ३ महिन्यांनी २० बैलगाड्या गावखत व गाळ जमिनीत टाकावीत.
गावखत उपलब्ध नसेल तर शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. मात्र हे खात उत्तम कुजलेले असावे, त्यात प्लास्टिक पिशव्या, काचा, प्लास्टिक इ. न कुजणाऱ्या वस्तूंचा समावेश नसावा.

♥रासायनिक खते :

पूर्व मशागतीच्या वेळी गावखत व तलावातील टाकल्यानंतर; लागवडीनंतर २५० ग्रॅम प्रति झाड १०:२६:२६ द्यावे. त्यानंतर खालीलप्रमाणे रासायनिक खतांचा वापर करावा.

♥खताचे नावखत देण्याची वेळमात्रा

१०:२६:२६लागवडीनंतर १ महिन्याने१०० ग्रॅम
एम. ओ. पी.लागवडीनंतर २ महिन्याने२०० ग्रॅम
डी. ए. पी.लागवडीनंतर ३ महिन्याने२५० ग्रॅम
डी. ए. पी.लागवडीनंतर ४ महिन्याने२५० ग्रॅम
डी. ए. पी.लागवडीनंतर ५ महिन्याने२५० ग्रॅम
१९:१९:१९लागवडीनंतर ६ महिन्याने२५० ग्रॅम
१९:१९:१९लागवडीनंतर ७ महिन्याने२५० ग्रॅम
एम. ओ. पी.लागवडीनंतर ७ महिन्याने१९० ग्रॅम

♥शेणकाला रबडी :

या खतांशिवाय शेणकाला रबडी वापरली तर दर्जेदार व वजनदार फळे मिळतात.
केवळ रबडीमुळे झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये देणे शक्य होते.
रबडी दिल्याने झाडांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात उपयुक्त जीवाणू मोठ्या प्रमाणात तयार होतात.
त्यांच्या कार्यामुळे झाडांना नत्र, स्फुरद व पालाश अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात. रबडी वापरामुळे दर एकरी ८० ते ८५ टन उत्पादन मिळालेली उदाहरणे आहेत.
रबडी तयार करण्यासाठी १०० किलो शेण ४०० लिटर पाण्यात भिजत घालावे. शेणाबरोबरच १० किलो फेरस सल्फेट, १० किलो मेंग्नीसियम सल्फेट व १० किलो बोराक्स मिसळावे.
हे मिश्रण काठीने हलवून चांगले एकजीवी करावे.
२४ तासंनातर पुन्हा ते काठीने हलवावे.
हि रबडी वापरताना यात पुन्हा ६०० लिटर पाणी मिसळून ते एकजीवी करून २४ तास ठेवून मग वापरावे.
या प्रक्रियेत सर्व सुक्ष्य अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात.
हे मिश्रण दर झाडी एक लिटर दर महा किमान सात वेळा दिल्यास परिणाम दिसून येतो. ठीबकाच्या खाली रेख पद्धतीचा वापर करून रबडी देण्यात यावी.
रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर राबडीचा वापर करावा. रबडी मिश्रण दिल्याने पाने गर्द हिरवी होतात; पिवळी दिसत नाहीत. झाडाची जोमदार वाढ होते तसेच फळांची संख्या आणि फळांचे वजन वाढते.
फळातील पोकळी कमी होऊन गर वाढतो.

♥पाणी व्यवस्थापन :

पपईला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
जास्त पाण्यामुळे पपईची मूळ कुजतात आणि खूप लवकर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. पपईची मुळे आखूड असल्याने ठिबकाने दिलेले पाणी त्यांना लवकर मिळते आणि जास्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत.
तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पपईतील बागेतील जमिनीतील पाण्याचा निचरा उत्तम राहतो आणि गरजे इतकेच पाणी दिल्यामुळे पपई जास्त निरोगी व जोमदार वाढते, दर्जेदार व वजनदार फळे मिळतात.
झाडाला दोन्ही बाजूला १ फूट (३० से.मी.) अंतरावर ठिबक बसवावेत.
दररोज दर झाडाला १२ लिटर पाणी मिळेल असे पाणी द्यावे. तीन महिन्यानंतर हे प्रमाण वाढवत जावे.
अश्या प्रकारे खत आणि पाणी व्यवस्थापन करून पपईचे दर्जेदार उत्पादन घेतले जाऊ शकते.

संकलित!

Comments

  1. छान व उपयुक्त माहिती आहे.

    ReplyDelete
  2. दर महिन्यला रबडीचा वापर किती वेळा करावा याबाबत मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  3. खुप सुदर सर माहीती दिली

    ReplyDelete
  4. खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!