कमी पाण्यात उन्हाळ्यात कापूस/पराठी लावण्यापुर्वी
कमी पाण्यात उन्हाळ्यात कापूस/पराठी लावण्यापुर्वी♥प्रगतशील शेतकरी♥
♥कमी पाण्यात उन्हाळ्यात कापूस/पराठी लावण्यापुर्वी हवामान,जमीन,तापमान,उपलब्ध पाणी,लागवडीची वेळ इत्यादि महत्वपूर्ण बाबी काळजीपुर्वक स्वत: बघा कारण तुमच्याकडे असलेल्या आवश्यक सामग्री ह्या इतरांपेक्षा आपणास योग्यरित्या माहीती आहेत.
♥निर्णय धेताना खाली दिलेल्या माहीतीची आपणास निश्चितच मदत करतील..
♥नगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रात सुमारे २५ ते २७ लाख हेकटर क्षेत्र असून त्यातील जिरायत क्षेत्राचे प्रमाण जास्त असून बागायत क्षेत्र ३ ते ४ टक्के आहे. प्रामुख्याने ज्या भागात उन्हाळी पीक घेतले जाते त्या भागातच कमी पाण्यात व ६ महिन्यात बागायत कापूस पिकाचे उत्पादन चांगले मिळत असल्याने आर्थिक गरजेसाठी या पिकास जास्त महत्त्व प्राप्त होते. उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे योग्य ठरेल.
♥हवामान : कापूस पिकास संपूर्ण कालावधीसाठी ५०० ते ६०० मि.मी. पाऊस लागतो.
♥पेरणीच्यावेळी ७५ ते १०० मि.मी. पाऊस ब बियाणे उगवणीसाठी १५ डी सें.ग्रे. तापमानाची गरज असते.
♥रोप अवस्थेत शारीरिक वाढीसाठी २१ ते २८ डी. सें.ग्रे. तापमानाची गरज असते.
♥कापसाला जास्त फुले येण्याकरिता दिवसाचे तापमान २४ डी ते २८ डी सें.ग्रे. रात्रीचे तापमान २० डी. ते २१ डी. सें.ग्रे. लागते.
♥रात्रीचे २४ डी. सें.ग्रे. चे वर व दिवसाचे ३० डी. सें.ग्रे. चे वर तापमान गेल्यास फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढते.
♥जमीन : कापूस लागवडीसाठी जमीन निवडताना त्या जमिनीच्या नावातच काळी कापसाची जमीन हा उल्लेख येतो. परंतु बागायती कापूस लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, ७ ते ८ पर्यंत सामू आणि १ % पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. मात्र हंगामातील कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन योग्य असते. पूर्वहंगामी कापूस लागवड मे महिन्यात होत असल्यामुळे जास्त हलक्य जमिनीत किंवा खोल काळ्या जमिनीत या पिकाची लागवड केल्यास पाणी व्यवस्थापनेमध्ये अडचणी येऊ शकतात, म्हणून जमिनीची निवड योग्य पद्धतीने होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
♥जमिनीची पूर्वतयारी : खोल नांगस्ट, कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. या पिकाच्या मुळ्या खोल जात असल्यामुळे हे आवश्यक आहे.
♥कापूस लागवडीपूर्वी शेवटची पाळी देताना ती पूर्व - पश्चिम द्यावी. म्हणजे लागवड करताना अडचण येणार नाही.
♥शेवटच्या पाळीपूर्वी एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे.
♥जमिनीची पूर्वतयारी : कोळपट (न नांगरलेल्या ) रानामध्ये कापूस लावू नये. कारण पाण्याचा किंवा पावसाचा थोडाही ताण पडल्यास अशा जमिनीतील कपाशीचे उत्पादन घटते, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे नांगरटीशिवाय कापूस लावू नये.
♥पूर्वीचे पीक गहू असेल तर उत्तम, नसल्यास एकरी एक ते दीड ट्रोंली गव्हाचे काड शेतात मिसळल्यास जमिनीला पाण्याच्या ताणाच्या काळात भेगा पडत नाहीत. पर्यायाने ओल उडण्याचे प्रमाण कमी होते.
♥लागवडीची वेळ : पूर्वहंगामी कापूस लागवड करताना आपण वेळेचा विचार कधी केल्याचे दिसून येत नाही.
मग अक्षय्य तृतीयेपासून ते मे अखेर किंवा जूनचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये आपण लागवड करत असतो.
या विषयावर जास्त माहिती व्हावी, म्हणून कपाशीचे शरीरशास्त्राचा या ठिकाणी आपण आधार घेणार आहोत.
काही थोड्या जाती वगळता इतर सर्व जातींमध्ये कपाशीच्या झाडास लागवडीपासून
३० ते ३५ दिवसांनी पाते,
५० ते ५५ दिवसांनी फुले,
९० दिवसांनी बोंडे तयार होणे आणि
१२० दिवसांनी बोंडे फुटून कापूस वेचणीस येतो.
♥जर १ ते २० मे रोजी कपाशीची लागवड केल्यास त्याची बोंडे फुटण्याची अवस्था ही साधारणपणे १० सप्टेंबर रोजी पूर्ण होते.
कापसाच्या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हमखास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.
त्यातल्या त्यात मराठवाडा विभागामध्ये परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणावर येतो, हे नक्की. मग यावेळी एकतर पावसामुळे बोंडे सडण्यास सुरुवात होते.
फुटलेले बोंड पावसात सापडल्यामुळे मोठे नुकसान होते आणि सुरुवातीस लागलेली चांगली बोंडे खराब झाल्यामुळे उत्पादनावर फार मोठा परिणाम संभवतो.
म्हणून पूर्वहंगामी कापूस लागवड २० मे ते २५ मे या दरम्यान करावी.
या अगोदर लागवड लक्षात घेऊन मगच वाणांची निवड करावी.
साधारणपणे ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच लागवड करणे योग्य.
लागवडीत चूक केल्यास तूट होण्याची शकयता जास्त असते.
संकलीत!
Comments
Post a Comment