पाने पिवळि पडण्याची कारणे व नियोजन
पाने पिवळि पडण्याची कारणे व नियोजन
1)मर :
मर रोग हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणार्या फ्युजॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो.
या रोगामुळे झाडांची पाने प्रथम पिवळी पडतात.
पानांवरील शिरांवर खाकी रंगाचे डाग दिसतात. झाडाचे खोडामधून कापल्यास आतील पेशी काळपट दिसतात.
झाडांची वाढ खुंटते आणि शेवटी झाडा मरते.
2) सूत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड ) : जमिनीतील सूत्रकृमीमुळे झाडाची वाढ खुंटते,
पाने पिवळी पडतात
आणि झाडाच्या मुळांवर गाठी येतात.
3)मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याचा असमतोल.
♥वांगी पिकातील बुरशीजन्य रोगाचे एकात्मिक रोग नियंत्रण
●रोगाचा प्रादुर्भाव झालेले रोगग्रस्त पाने सडलेले, किडके फळे गोळा करून बांधावर किंवा प्लॉट शेजारी उघड्यावर न टाकता जाळून नष्ट करावे.
●पानांवरील करपा, फळकूज, पानांवरील ठिपके आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन १० ग्रॅम अथवा डायथेन एम-४५, २५ ग्रॅम यांपैकी एक औषध, परंतु आलटून पालटून १० लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
●भुरीसाठी पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम वरील औषधात मिसळून फवारणी करावी.
●जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला नसल्यास लागवडीनंतर किंवा रोगाची लक्षणे दिसताच बाविस्टीन १० ग्रॅम बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण साधारणतः
५० ते १०० मि.लि. झाडाच्या बुंध्याभोवती रिंग करून १५ दिवसांच्या अंतराने दोनदा ओतावे.
●सूत्रकृमी या रोगाच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीचा जमिनीत वापर करावा.
बांधावर तसेच दांडाने झेंडूची लागवड करावी.
●मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन.
Comments
Post a Comment