सेंद्रिय शेती म्हणजे काय ?
सेंद्रिय शेती ♥प्रगतशील शेतकरी ♥
♥शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठया प्रमाणावर करताना दिसून येतात.
परंतु काही पिकांची उत्पादनवाढ तात्पुरत्या स्वरुपाची किंवा काही काळासाठीच असते. याचे कारण असे की, आपण उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो.
परिणामी जर रासायनिक खतांना अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.
परिणामी जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते.
खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठयाप्रमाणावर द्यावे लागते. त्यामुळे साहजिकच क्षारांचे प्रमाण वाढते; जमिनी खार वाटतात.
♥कीटक नाशकांप्रमानेच औषधांचा अधिकाधिक वापर करण्याकडे शेतकऱ्यांना ओढा असलेला दिसून येतो.
भाजीपाला, फळे, कापूस इत्यादी पिकांना किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून कीटकनाशके वापरली जातात.
ही कीटकनाशके विषारी तर असतात.
त्यामुळे उपद्रवकारक कीटक मरतात.
त्याचप्रमाणे काही उपक्रम जीवजंतू ही बळी जातात.
निसर्गातील काही जीवाणू वा कीटक शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतात.
गांडुळासारख्या जीवाणूस तर शेतकऱ्यांचा मित्रच म्हटले जाते.
अशा जिवाणूंना अशा कीटकनाशकामुळे अपाय पोहचतो.
♥आज शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके व तृणनाशके इत्यादींचा वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व अन्न सुरक्षा वाढविणे आणि त्याच वेळी उत्पादन खर्चही कमी करणे.
अशा दुहेरी दृष्टिकोनातून सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्यामध्ये पुढाकार घेतलेला दिसून येतो.
♥सेंद्रीय शेती संकल्पनेतील महत्वाच्या बाबी
☆सेंद्रीय पदार्थांचा जोरखतांद्वारे वापर.
☆जीवाणू संवर्धकांचा वापर .
☆हिरवळीच्या खतांचा उपयोग.
☆गांडूळ शेती किंवा गांडूळ खताचा वापर.
☆कीड व्यवस्थापन.
☆आच्छादनांचा योग्य वापर.
☆रॉक फॉस्फेट व जिप्सम यांसारख्या खनिजांचा शेतीत वापर.
☆पिकांच्या अवशेषांचा व अन्न प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा तसेच ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट करून वापर.
☆पिक फेरपालट व आंतर पिकपध्दतीचा उपयोग.
संकलित!
Comments
Post a Comment