हळद लागवड
तयारी हळद लागवडीची? ♥प्रगतशील शेतकरी♥
♥हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे.
♥जमिनीची पूर्वमशागत
जमीन चांगली निचरा होणारी असावी. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी.
जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
♥लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे.
♥हळद, आले यांसारख्या कंदवर्गीय पिकाच्या बेवडावरती पुन्हा हळदीची लागवड करू नये.
♥भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक घेण्याचे टाळावे.
♥चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केल्यास पिकावर कायम पिवळसर छटा राहते, उत्पादनात घट येते.
♥हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहते अत्यंत महत्त्वाचे आहे.
♥या पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची उभी- आडवी नांगरट करून घ्यावी.
दोन नांगरटीनंतर ढेकळे फोडून घ्यावीत.
♥जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
♥तसेच अगोदरच्या पिकाच्या काड्या वेचून घ्याव्यात.
♥उपलब्धतेनुसार चांगले कुजलेले शेणखत एकरी १० ते १२ टन शेतात पसरवून टाकावे.
♥हळद खत नियोजन ♥प्रगतशील शेतकरी ♥
♥शेणखताची मात्रा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यास इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा.
♥यामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, घडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींच्या मिश्रणाचा समावेश करावा.
♥ओल्या मळीचा वापर हळदीसाठी टाळावा.
♥एकरी २५० किलो सुपर फॉस्फेट आणि
८० किलो म्युरेट अॉफ पोटॅश या खतांचा वापर जमीन तयार करतेवेळी करावा.
बेण्याची निवड♥प्रगतशील शेतकरी ♥
♥बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी.
♥बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
☆मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे,
☆बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे,
☆तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत.
♥बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे.
♥बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
♥बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते.
असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो.
असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते.
♥मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे.
♥बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी.
♥बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे.
♥ अनुभव-पावणदोन एकरात ७० क्विंटल हळद♥प्रगतशील शेतकरी♥
भास्कर लांडे, हिंगोली दरवर्षी घाती घेत असलेल्या कापसाला कंटाळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळदीच्या रूपाने नगदी पिकात पर्याय मिळाला.
त्याला हिंगोलीत उपलब्ध असलेल्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या बाजारपेठेमुळे अधिकच वाव मिळाला.
त्याचा फायदा उठवित उपलब्ध पाण्यात, आहे त्या जमिनीत, खत, बी, फवारणीच्या वेळेचे योग्य नियोजन जीवन क्यातमवार यांनी केले.
त्याचा परिपाक पावणे दोन एकरात ७० हजारांच्या खर्चात वाळून ७० क्विंटल हळद झाल्याने सव्वाचार लाखांचे उत्पन्न काढण्याची किमया माजी सैैनिकाने केली.
औंढा तालुक्यातील जामगव्हाण येथील जीवन क्यातमवार यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीत वेळ घालविण्याचा ठरविले. ‘पाण्याविना शेती अन् शेतकऱ्याची माती’ या म्हणीनुसार त्यांनी शेतात बोअर घेतला.
योगायोगाने बऱ्यापैैकी पाणी लागल्याने शेती फुलविता आली.
पाण्याची उपलब्धता झाली तरी केळी, संत्रा, पपई आदी फळपिके घेण्यापुरते भरमसाठ पाणी नव्हते.
अधिक पाण्याचे पिकही घेता येत नव्हते आणि सात एकरातील पिकांना पाणी पुरत नव्हते. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाने शेतकऱ्यांना बेजार केले होते. भरमसाठ खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नव्हते.
उलट जमिनीतील कस नाहीसा होत होता. सुरूवातीला एक-दोन वर्षांत क्यातमवार यांना कापसाच्या पिकाचा अनुभव वाईट आला.
म्हणून कापसाला दूर लोटीत क्यातमवार यांनी हळदीला जवळ केले.
हळद पिकविण्यापेक्षा विकण्याला सर्वात महत्व असते.
प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने हळदीला नकारले जाते; पण राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ हिंगोलीत आहे.
वर्षभर बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम भाव मिळतो.
शिवाय हळदीलाही रास्त भाव मिळत असल्याचे पाहून क्यातमवार यांनी गतवर्षी मृगनक्षत्रात पावणे दोन एकर जमीन हळद लागवडीसाठी तयार केली.
जमिनीची योग्य मशागत करून शेलम जातीच्या १५ क्विंटल बियाण्यांची लागवड बेड पद्धतीने केली.
२१ दिवसानंतर निघालेल्या हळदीला बरोबर एक महिना झाल्यानंतर पोटॅश आणि १०:२४:२४ खताचे सात पोते टाकले.
दरम्यान पीक वाढत जात असताना कोळपणी, निंदणी करण्यात आली. हळदीला माल लागतेवेळी ६ पोते डीएपी आणि चार पोते पोटॅश खताचा दुसरा डोस दिला.
एकीकडे पीक वाढत असताना आलेल्या धुईमुळे रोगराईचे आक्रमण होत राहिले.
खासकरून बुरशीची वाढ होत राहिल्याने चारवेळेस फवारणी करावी लागली.
मान्सूनचा पाऊस संपताच ठिबकद्वारे पिकास पाणी दिले. परिणामी पाण्याची बचत झाली, पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्याने फळधारणा चांगली झाली.
नुकत्याच संपलेल्या हंगामात काढण्यात आलेली हळद वाळविण्यात आली.
वाळवून मोजलेली हळद ७० क्विंटल भरली.
दुर्देवाने बाजारभाव घसरून ६ हजारांवर आल्याने हळद विक्री लांबविली.
वर्षभर दिवसरात्र एक करून लावलेली हळद विक्रीला येताच भाव घसरल्याने क्यातमवार निराश झाले; परंतु आजघडीला उपलब्ध ६ हजारांच्या भावात ७० क्विंटल हळद विकली तरी सव्वाचार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
केवळ ७० हजारांच्या खर्चात यापूर्वी कोणत्याही पिकाचे उत्पादन झाले नव्हते.
कितीही खर्च केला तरी कापूस अपेक्षीत उत्पादन देत नव्हता; पण हळदीने केलेल्या खर्चाची चीज करीत विक्रमी ७० क्विंटल उत्पादन दिले.
आता हळदीच्या रूपयाने नगदी पिकात पर्याय मिळाला.
तर कमी खर्चात, कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेण्याचा आटोपही आल्याचे क्यातमवार म्हणाले. ~संकलन
♥ हळद काढणी चे प्लानिंगअशी करा♥प्रगतशील शेतकरी♥
☆सध्या महाराष्ट्रामध्ये हळद वाढीच्या शेवटच्या अवस्थेमध्ये असून, काही ठिकाणी हळद काढणी सुरू झालेली आहे. हळदीचा जातीपरत्वे लागवडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पक्व झाल्याची लक्षणे तपासून शास्त्रीय पद्धतीने काढणी करावी.
☆हळदीच्या जाती या प्रामुख्याने पक्वतेनुसार तीन प्रकारांमध्ये मोडतात.
यामध्ये ज्या जाती तयार होण्यासाठी लागवडीपासून 6 ते 7 महिने लागतात त्यास हळव्या जाती असे म्हणतात.
ज्या जातीस 7 ते 8 महिने लागतात त्यास निमगरव्या असे म्हणतात,
तर 8 ते 9 महिने पक्व होण्यासाठी लागणाऱ्या जातींना गरव्या जाती असे म्हणतात.
☆महाराष्ट्रातील एकूण हळद लागवडीखालील क्षेत्रापैकी 80 टक्के क्षेत्र हे सेलम या जातीखाली असून, ही जात गरव्या या प्रकारात मोडत असून, ती तयार होण्यास 9 महिने लागतात.
☆ जातीपरत्वे पिकाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय हळदीची काढणी करू नये.
उर्वरीत क्षेत्रामध्ये कडप्पा, वायगाव, कृष्णा, राजापुरी, फुले स्वरूपा इत्यादी जातींचा समावेश होतो. या जातीही तयार होण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो.
☆हळद पीक काढणीस तयार झाल्याची लक्षणे -
- लागवडीपासून जातीपरत्वे पिकाचा कालावधी पाहवा.
- जातीच्या प्रकारानुसार हळदीचा पाला सुकला जातो.
- हलक्या माळरानाच्या जमिनीमध्ये 70 ते 80 टक्के पाला सुकला जातो.
- भारी काळ्या जमिनीमध्ये 60 ते 70 टक्के पाला सुकला जातो.
- हळदीचे कंद काढून पाहिल्यास कंदावरील/ओल्या हळकुंडावरील खवले तपकिरी रंगाचे दिसून साल जाडसर होते.
- हळदीमधील पाण्याचा अंश 90 टक्क्यांहून 72 ते 75 टक्क्यांपर्यंत खाली उतरतो.
☆अधिक उत्पादनासाठी...
- हळदीच्या पानामधील अन्नद्रव्ये कंदामध्ये उतरण्यासाठी गरव्या जातींचा पाला नऊ महिने पूर्ण होईपर्यंत कापू नये. हळदीचा उतारा चांगला मिळतो.
- हलक्या जमिनीमध्ये हळदीचे पाणी आठ महिन्यांपासून कमी करत साडेआठ महिने पूर्ण होताच बंद करावे.
काळ्या खोल जमिनीमध्ये हळद लागवड असल्यास पीक आठ महिन्यांचे झाल्यानंतर लगेच पाणी बंद करावे.
- पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हळदीचा पाला जमिनीलगत धारदार खुरप्याने कापून घ्यावा. 4 ते 5 दिवस पाला शेतातच वाळू द्यावा. त्यानंतर तो गोळा करावा. त्याचा उपयोग हळद शिजविण्यासाठी इंधन म्हणून किंवा कंपोस्ट कल्चर वापरून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत करण्यासाठी होऊ शकतो.
- आठ महिने पूर्ण होईपर्यंत 0-0-50 या खताचा वापर करावा. त्यामुळे हळदीच्या कंदाची उगवण होऊन कंदास वजन मिळण्यास मदत होते.
- पाला कापणीनंतर आठ ते दहा दिवसांनंतर थोडीशी जमीन भेगाळल्यानंतर सरी वरंबा पद्धतीच्या लागवडीमध्ये कुदळ किंवा टिकावाच्या साह्याने हळदीची काढणी करावी.
काढणी करताना वरंब्याच्या तीन ते पाच सें.मी. समोर कुदळ/टिकाव एकाच ठिकाणी एक ते दोन वेळा जोराने मारून दांडा उलट दिशेला दाबल्यास गड्डा सर्व प्रकारच्या कंदासह उलटा होतो. मात्र, कुदळी वेगवेगळ्या ठिकाणी मारल्यास गड्डा फुटून हळकुंडे फुटण्याची जास्त शक्यता असते.
☆यांत्रिक पद्धतीने हळद काढणी -
हळदीची लागवड गादी वाफा पद्धतीने केली असल्यास हळदीची काढणी यंत्राद्वारे करता येते. यंत्राद्वारे हळद काढणी करण्याकरिता दोन गादी वाफ्यांमधील अंतर कमीत कमी 120 सें.मी. ठेवावे.
त्यापेक्षा अंतर कमी ठेवल्यास काढणी केलेली हळद ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून खराब होण्याचा धोका असतो.
- जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीमध्ये कमीत कमी 35 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर करावा,
तर मध्यम किंवा भारी काळ्या जमिनीमध्ये आवश्यकतेनुसार जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर करावा.
- हळदीचे कंद जमिनीमध्ये 1 फूट खोलीपर्यंत वाढत असल्याने या यंत्राचे फण कंदाच्या खाली जाऊन कंद वर उचलतात.
यंत्रास असलेल्या व्हायब्रेटरच्या साह्याने कंदाची माती झाडली जाऊन कंद पाठीमागील बाजूस पडतात.
- यांत्रिक पद्धतीने एका दिवसात सरासरी 1 हेक्टर क्षेत्रावरील हळद काढता येते.
पारंपरिक पद्धतीने काढणीस दोन ते तीन दिवस लागतात.
तसेच जमिनीमध्ये राहणाऱ्या हळकुंडांचे प्रमाण खूप कमी (4 ते 5 टक्के) राहते.
पारंपरिक पद्धतीमध्ये 8 ते 10 टक्के हळकुंडे जमिनीमध्ये राहतात.
तसेच कंदास मातीचे प्रमाण कमी राहते.
नंतरचा मजुरी खर्च कमी होतो.
- एक हेक्टरमधील हळद काढणीसाठी साधारणतः 25 लिटर डिझेल लागते.
- काढणीनंतर कंद 2 ते 3 दिवस उन्हामध्ये उलटे ठेवावेत.
त्यामुळे त्यास चिकटलेली माती मोकळी होण्यास मदत होते.
नंतर हे गड्डे आपटल्यास त्यास चिकटलेली माती निघून जाते.
गड्डे व हळकुंडे एकमेकांपासून वेगळी होतात.
त्यानंतर सोरागड्डे, जेठेगड्डे, बगलगड्डे व हळकुंडे अशी प्रतवारी करावी.
त्यातील सोरागड्डे सुकण्यासाठी उन्हात ठेवावेत.
जेठेगड्डे किंवा बगलगड्डे बियाण्यासाठी वापरावयाचे असल्यास लगेच सावलीत ठेवावेत.
हळकुंडावर प्रक्रिया करण्यासाठी हळकुंडे शेतामध्ये एका जागी ढीग करून ठेवावीत.
☆जातीपरत्वे हळद कंदाचे हेक्टरी 250 ते 350 क्विंटल (ओले) उत्पादन मिळते. सुकल्यानंतर त्याचे वजन साधारणपणे 50 ते 70 क्विंटल इतके भरते.
~संकलन
♥अनुभव~दहा गुंठ्यात सव्वा लाखाची हळद♥प्रगतशील शेतकरी♥
☆भौगोलिक परिस्थिती व जंगली जनावरांच्या त्रासामुळे कोकणातील शेती बिकट परिस्थितीतून जात आहे. भातशेती तोट्यात आहे. मोजकेच शेतकरी दुबार पीक पद्धतीचा अवलंब करून भाजीपाला, कडधान्य पीक घेताना दिसतात.
यातून मार्ग काढण्यासाठी व शेतकऱ्यांचे स्थान बळकट करण्यासाठी गरज आहे ती योग्य नगदी पिकाची.
ही गरज भरून काढू शकणारे पीक म्हणजे हळद.
या पिकाला मोठा खर्च नाही.
विशेष लक्ष द्यावे लागत नाही. विशेषत: माकड, वानरांपासून त्रास नाही.
अशा हळद पिकाची लागवड करून 10 गुंठे क्षेत्रावर एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न सचिन कारेकर या आबलोलीतील एका तरुण शेतकऱ्याने घेतले आहे.
☆हळदीचे महत्त्व आयुर्वेदातही आहे.
बहुगुणी हळदीची लागवड पूर्वी कोकणात घरोघरी होत होती.
परसात थोडी तरी हळद लागवड करून वर्षभर कुटुंबाला लागणारी हळद शेतकरी घरीच पिकवत होते. आता हे प्रमाण हळूहळू कमी झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात हळदीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.
कोकणात व्यापारी तत्त्वावर हळद लागवड करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे;
मात्र हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच शेतकरी हळद लागवड करतात.
त्याच सचिनचा समावेश करावा लागेल.
☆भातशेती करत असतानाच 2002-03 पासून सचिनने प्रायोगिक तत्त्वावर हळद लागवड करण्याचे ठरविले.
आबलोली हायस्कूलचे शिक्षक श्री. शेंडगे यांच्या मदतीने सांगलीतून "कडप्पा' जातीचे केवळ 25 कंद (बेणे) लागवडीसाठी मिळविले आणि हळद लागवडीचा शुभारंभ केला.
गेल्या 5-6 वर्षांत हळद लागवड करताना अनेक चढउतार त्याने पाहिले आणि तो शिकत गेला.
लागवडीबरोबरच हळद काढणीपश्चात प्रक्रिया, बाजारपेठ यातील बारकाव्यांचा अभ्यास केला.
गेल्या वर्षीच्या खरिपात मात्र आधुनिक पद्धतीने हळद लावण्याचा विचार त्याने पक्का केला.
☆19 जून, गुंठे क्षेत्रावर हळद लागवड केली.
तेथे ठिबक सिंचन यंत्रणा बसविली.
एकूण 2500 कंद लागवडीसाठी लागले.
एकूण 200 किलो बियाणे लागवडीसाठी लागले.
गांडुळखत, गिरीपुष्पाचा पाला, सुफला, युरिया-डीएपी ब्रिकेटच्या गोळ्यांचा वापर त्याने केला.
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये आठ दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनातून प्रत्येक वेळी 4 किलो या प्रमाणे 6 वेळा 12:61:0 या पाण्यात विरघळणाऱ्या खताची मात्रा दिली.
ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात एकेकदा अशा दोन वेळा स्लरीच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा केला.
☆त्याकरिता 200 लिटर पाण्यात 5 लिटर गोमूत्र, 10 किलो गावठी गाईचे शेण, 500 ग्रॅम गूळ व 500 ग्रॅम डाळीचे पीठ, एक आठवडाभर भिजत ठेवले.
या स्लरीचा वापर करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर त्यामध्ये 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये घातली.
हे संपूर्ण मिश्रण 2000 लिटर पाण्यात सौम्य करून हळदीचे बुंध्यात ओतले.
☆हळद पीक तयार होण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी लागतो.
हळदीला कीड रोगाचा प्रादुर्भाव इतर पिकांपेक्षा कमी आहे;
☆मात्र प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून रोगर (डायमेथोएट) व बाविस्टीन तर वाढीकरिता 19:19:19 व मायक्रोला खत फवारणीद्वारे दिले.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हळदीची काढणी केली.
☆प्रतिकंदापासून सरासरी 2 किलो ओली हळद मिळाली.
एकूण 800 किलो कंद (बियाणे) व 564 किलो हळकुंडाचे उत्पादन मिळाले.
☆हळद काढणीनंतर कंद पुढील वर्षाच्या लागवडीसाठी बियाणे म्हणून बाजूला काढले व हळकुंडावर स्वत: प्रक्रिया करून विक्रीसाठी पूड तयार केली.
350 किलो कंद बियाण्यासाठी स्वत:कडे ठेवले व
450 किलो कंद बियाणे म्हणून सचिनने गुहागर तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना विकले.
या बियाण्यापासून प्रतिकिलो 60 रुपये दराने 27 हजार रुपये केवळ बियाणे विक्रीतून मिळाले.
☆हळकुंडाची विक्री केली नाही.
हळकुंडावर स्वत:च प्रक्रिया केली.
उकळणे, पॉलिश करणे आणि त्यानंतर पावडर तयार करणे, इत्यादी प्रक्रिया पार पाडली. 564 किलो हळकुंडावर प्रक्रिया करून 525 किलो हळद मिळाली.
☆या गावठी हळदीची विक्री सचिन स्वतःच्या दुकानात करतो.
☆मिळकत (उत्पन्न )
प्रतिकिलो 160 रुपये दर मिळतो.
हळद विक्रीपासून एकूण 84 हजाराचे उत्पन्न अपेक्षित आहे.
हळदीच्या कंदापासून 48 हजार
व हळद पावडरपासून 84 हजार रुपयांचे
असे मिळून 1 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
☆खर्च (गुंतवणुक)
बियाणे 10 हजार,
ठिबक सिंचन संच 3 हजार,
नांगरणे, बेड तयार करणे व तर काढणीपर्यंत मजुरी 8 हजार 640 रुपये,
खते व औषधे 4 हजार 320 रुपये
तर काढणीपश्चात प्रक्रिया खर्च 15 हजार 160 रुपये
असे एकूण 41 हजार 120 रुपये
☆नफा (शिल्लक)
खर्च वजा जाता 90 हजार 880 रुपयांचा निव्वळ फायदा 10 गुंठे हळद लागवडीपासून मिळाला आहे.
कोकणात केवळ 10 गुंठे क्षेत्रात 91 हजार रुपयांचा निव्वळ फायदा मिळविणारे कदाचित हे पहिले उदाहरण असेल.
☆गेल्या वर्षी त्याने साडेसात गुंठे क्षेत्रावर हळदीची लागवड केली होती. तेव्हा 200 किलो हळदीचे उत्पन्न मिळाले. प्रतिकिलो 80 रुपये दर मिळाला. सोळा हजार रुपयांचे उत्पन्न तेव्हा मिळाले. त्यावरून यावर्षी त्याचा उत्पन्नात सव्वा लाखापर्यंत वाढ झाली आहे.
~संकलन
गजानन रामराव काकडे
ReplyDeleteगजानन रामराव काकडे
ReplyDelete