डाळींब फवारणी नियोजन असे कराल .. Spraying management in Pomegranate
डाळींब फवारणी नियोजन असे कराल 🇮🇳प्रगतशील शेतकरी 🏆
♥दोन टक्के बोर्डोमिश्रण किंवा एक टक्का कॉपर आक्सीक्लोराईडचे द्रावण पाच लिटर प्रति झाड प्रमाणे दयावे.
♥ त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी 2.5 किलो ट्रायकोडर्मा 100 किलो शेणखत यांचे मिश्रण करुन खोडाजवळ जमिनीत मिसळून प्रतिहेक्टरी दयावेत.
♥मर रोग झालेल्या झाडाच्या आजूबाजूच्या दोन ओळीतील झाडांना ट्रायकोडर्माचे प्रमाण पाच पटीने वाढवावे.
♥ तसेच बोर्डो मिश्रण किंवा एक टक्का कॉपर ऑक्सीक्लोराईडचे द्रावण 10 लिटर प्रति झाड या प्रमाणात द्यावे.
♥दर महिन्याला दोन किलो शेणखत प्रति झाड जमिनीमध्ये खोडाजवळ मिसळून दयावे.
सूत्रकृमी असलेल्या भागामध्ये बहार घेताना निंबोळी पेंड दोन टन प्रति हेक्टरी आणि
♥नंतर तीन महिन्याने चाळीस किलो दहा टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून दयावे.
♥खोडास लहान छिद्र पाडणारे भूंगेरे यांच्या नियंत्रणासाठी खोडावर चारशे ग्रॅम गेरु अ 2.5 मिलि लिंडेन किंवा
5 मिलि क्लोरोपायरीफॉस अथवा
2.5 ग्रम् ब्लायटॉक्स एक लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाचा खोडास मुलामा दयावा.
♥ त्याच प्रमाणे मुळावर लिंडेन ( 2.5 मिलि ) किंवा / क्लेारोप्लायरोफॉस (5 मिलि ) ब्लायटॉक्स 2.5 ग्रॅम घेवून प्रतिझाड पाच लिटर द्रावण खोडाच्या शेजारी मुळांना पोहोचेल असे दयावे.
♥खोड किड नियंत्रणासाठी फेनव्हेलरेट 5 मिलि प्रति लिटर पाण्यात किंवा
डायक्लोरोफॉस 10 मिलि प्रतिलिटर पाण्याचे इंजेक्शन पिचकारीच्या साहायाने छिद्रात सोडावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे.
卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐卐
Comments
Post a Comment