चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो
बुलढाणा जिल्हा
♥"चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो "
चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो
कोरडा डोळा , कोरडी विहीर
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
"चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो "
वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
काही महिन्यान पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
"चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो
या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
"चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो "
बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
पोराला शिकवल तर ,पोरगी राह्यते कोरी
दुःखाचा तर उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
"चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो "
असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो
योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
"चल दोस्ता तुला " बुलढाणा जिल्हा" दाखवतो .
♥भौगोलिक माहिती
जिल्ह्याची रचना
बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे.
तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये १३ तहसील असून ५ महसूल उपविभाग आहेत.
जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा असून या जिल्ह्यापासून औरंगाबाद (१५० कि मी), अमरावती(२०० कि मी), पुणे(४२५ कि मी), नागपूर(३५० कि मी) अंतरावर आहे.
लोणार, शेगाव, सैलानी दर्गा, जिजामाता जन्म ठिकाण हे या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
♥२०११ च्या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २५,८८,०३९ असून लिंग प्रमाण ९२८/१००० आहे. तसेच शिक्षणाची शेकडेवारी प्रमाण ८२.०९% आहे.
♥कापूस,ज्वारी, सोयाबीन, सुर्यफुल हे या जिल्ह्यातील महत्वाचे पिके आहेत. खामगाव, मलकापूर हे महत्वाचे औद्योगिक शहरे आहेत
♥भौगोलिक माहिती
जिल्ह्याचे ठिकाण
बुलढाणा
भौगोलिक सीमाअक्षांश १९.५१° ते २१.१७° उ. व रेखाक्ष ७५.५७° ते ६.५९° पू. उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना, पश्चिमेस जालना व जळगाव.
क्षेत्रफळ९,६४० चौ कि मी
पाउस जुन ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून
हवामानउष्ण व कोरडा उन्हाळा आणि थंड हिवाळाजनगणना २०११
लोकसंख्या२५,८८,०३९
लोकसंख्या घनत्व२६८ प्रती चौ कि मी
लिंग प्रमाण९२८ स्त्री प्रती १००० पुरुष
शिक्षणाचे प्रमाण८२.०९%इतर
♥पर्यटन स्थळे
१. लोणार सरोवर
२. वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण, सिंदखेड राजा
३. स्वामी विवेकानंद आश्रम
४. संत गजानन महाराज देवस्थान, शेगाव
५. सैलानी बाबा दर्गाह, चिखली
६. जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती, नांदुरा
7. प्रसिद्ध बालगी मंदिर, मेहकर
♥रेल्वे स्थानकजिल्ह्याच्या ठिकाण पासून
मलकापूर (५० किमी),
नांदुरा (४५ किमी),
शेगाव (७० किमी)
राष्ट्रीय महामार्गराष्ट्रीय महामार्ग न ६ (खामगाव, नांदुरा, मलकापूर)
जवळील विमानतळऔरंगाबाद १५० किमी
राज्य परिवहन महामंडळ आगारबुलढाणा, मलकापूर, चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद.
♥जिल्ह्याची रचना
महसूल उपविभागबुलढाणा, मेहकर, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद.
प्रमुख - उपविभागीय अधिकारी
महसूल तालुके
बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर. प्रमुख - तहसीलदार
Comments
Post a Comment