पिंपळनेर, साक्री तालुका विशेष
पिंपळनेर, साक्री तालुका विशेष
♥धुळे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण.
♥लोकसंख्या १७,५५७ (२००१). हे कान नदीच्या (पिंपळनेर गावाची पांझरा नदीची उपनदी) काठावर धुळे शहराच्या वायव्येस सु. ५० किमी. सुरत–नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र .सहावर वसले आहे.
♥हे गाव मूळचे पिंपळनेर तालुक्यातील असून १८८७ मध्ये पिंपळनेर येथील तालुक्याचे मुख्यालय साक्री येथे हलविण्यात आले व १९०८ मध्ये तालुक्याचे नावही साक्री करण्यात आले.
♥याच्या परिसरात गावित, कोकणा, भिल्ल, पावरा, मावची, कातकरी, वंजारी इ. जमातींचे प्रमाण जास्त आहे.
♥येथील हवामान उष्ण व कोरडे असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६० सेंमी. आहे.
♥ परिसरातील ऊस, कापूस, भुईमूग, ज्वारी इ. शेतमालाची साक्री ही बाजारपेठ असून, जिल्ह्यांतील तांदुळ, मका, ऊस, भाजीपाला ई. उत्पादनांची प्रमुख बाजारपेठ म्हणून पिंपळनेर या शहराची ओळख आहे.
♥साक्री तालुक्यातील भाडणे येथे पांझरा-काना सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे.
♥ तसेच आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनउर्जा प्रकल्प ब्राह्मणवेल या साक्री नजीकच्या गावी आहे.
♥साक्रीतील अक्कलपाडा तलाव, गोमटेश्वर मंदिर, नागझरी व नागाईदेवीचे मंदिर इ. प्रसिद्घ स्थळे आहेत. तसेच पिंपळनेर परिसरातील गांगेश्वर (चिकसे), मांगीतुंगी (ताराहाबाद), स्वामीमठ (कासारे), धनदाई (म्हसदी), मानवकेंद्र (पिंपळनेर), लाटीपाडा धरण (पिंपळनेर) इ. प्रसिद्घ स्थळे आहेत.
♥तालुक्यातील बळसाणे हे यादवकालीन मंदिरसममूहासाठी व कलात्मक ⇨ वीरगळांसाठी प्रसिद्घ असलेले ठिकाण शहराच्या उत्तरेस आहे.
Comments
Post a Comment