भाकरीचा मेळ
🙏🏻🍪भाकरीचा मेळ🍪🙏🏻
तू स्वप्नांना बळ दे मी
संसाराला ठिगळ लावतो
जमलंच तर संध्याकाळच्या
🍪भाकरीचा मेळ लावतो..
तू वाचत रहा पोथीपुराण
सत्यनारायनाची पूजा कर
अजून थोड़ी वाट पहा
अजून थोड़ा धीर धर
मी बाजारात पोटासाठी
डोम्बा-याचा खेळ लावतो
जमलंच तर संध्याकाळच्या
🍪भाकरीचा मेळ लावतो...
लोकं खुशाल जगतायत
कंप्यूटर, इंटरनेट,
व्हाॅट्सअप च्या युगात
त्यांना खरंच पटत नाही की
🍪भाकरीचा प्रश्न आपला
अजूनही सुटत नाही
कळणारांना कळू दे
छळणारांना छळू दे
मी आज आतड्यांना
अजून थोडा पीळ लावतो
जमलंच तर संध्याकाळच्या
🍪भाकरीचा मेळ लावतो...
तू म्हण म्हणायचा तर
हरिपाठ मनातल्या मनात
लेकरांना मात्र
बाबासाहेब उगाळून पाज
शिवाजीची कथा सांग
तुकोबाची गाथा सांग
राजे उमाजीची क्रांति सांग
गाडगेबाबाचा त्याग सांग सावित्री मायची कथा सांग
मी आज घरी यायला
मुद्दाम थोडा वेळ लावतो
जमलंच तर संध्याकाळच्या
🍪भाकरीचा मेळ लावतो,
तू स्वप्नांना बळ दे
मी संसाराला ठिगळ लावतो,
जमलंच तर उद्या पुन्हा
🍪भाकरीचा मेळ लावतो...!!
🍪🍪🍪🍪🍪🍪🍪🍪🍪🍪
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(कुणी लिहिली कविता
माहिती नाही
परंतु सत्य विचार माङंलेत)
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment