फळवाढीच्या काळात हापूसला द्या पाणी Give water to Hapus Mango at time of fruit growth
फळवाढीच्या काळात हापूसला द्या पाणी
♥हापूस कलमांना फळधारणा झाल्यानंतर फळे वाटाण्याच्या आकाराची असताना प्रत्येक कलमास १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
फळे सुपारी व अंडाकृती आकाराची असताना प्रत्येक कलमास पाणी दिल्यास फळगळ कमी होते.
फळांचा आकार वाढून उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते.
♥हापूस आंब्याची पारंपरिक लागवड ही डोंगर उतारावर, कातळावर झालेली आहे.
अशा बागांमध्ये पाण्याची मुबलक उपलब्धता नसते.
नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये पहिली २ ते ३ वर्षं पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. नवीन लागवडीस खालीलप्रमाणे पाणी द्यावे.
♥१) पाणी देण्यासाठी आळे बांधून घ्यावे.
प्रत्येकवेळी किमान ३० लिटर पाणी द्यावे.
आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.
♥२) पाण्याची चांगली सोय असल्यास पहिली काही वर्षे आंतरपिकांची लागवड करावी. त्याचा फायदा कलमांच्या वाढीस होतो.
पाण्याची चांगली सोय असलेल्या ठिकाणी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
यामुळे झाडाला व आवश्यकतेप्रमाणे पाणी मिळून पाण्याच्या बचतीबरोबरच मजुरी खर्च कमी होतो.
♥३) फळधारणेसाठी योग्य विस्तार झाल्यानंतर पाण्याची गरज कमी होते.
पावसाळा संपल्यापासून ते मोहोर येईपर्यंत कलमाला पाण्याची आवश्यकता नसते.
♥४) फळधारणा झाल्यानंतर मात्र फळवाढीच्या अवस्थेमध्ये कलमाला पाणी देणे आवश्यक असते.
फळवाढीच्या कालावधीमध्ये उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जमिनीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते, त्यामुळे वाढणाऱ्या फळांमध्ये पाण्यासाठी तीव्र स्पर्धा होऊन फळगळ होण्याची शक्यता असते. या वेळी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण होऊन फळगळ कमी करण्यास मदत होते, तसेच या पाण्यात अन्नद्रव्ये विरघळून फळांना मिळाल्याने फळांचा आकारदेखील वाढतो.
♥५) फळधारणा झाल्यानंतर फळे वाटाण्याच्या आकाराची असताना प्रत्येक कलमास १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
फळे सुपारी व अंडाकृती आकाराची असतानादेखील याच प्रमाणात प्रत्येक कलमास पाणी दिल्यास फळगळ कमी होते.
फळांचा आकार वाढून उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते.
♥६) फळे अंडाकृती आकाराची झाल्यानंतर पुढील काळात पाणी बंद करावे, अन्यथा फळे पक्व होण्यासाठी जास्त दिवस लागतात.
♥७) पाणी दिलेल्या कलमांना आच्छादन करावे.
यामुळे उन्हामुळे पाण्याची होणारी वाफ कमी होऊन ओलावा जास्त कालावधीपर्यंत टिकून राहतो.
संकलीत
Comments
Post a Comment