कांदा लावून बिजोत्पादन- Seed Production from Onion plant
कांदा लावून बिजोत्पादन असे कराल ♡ प्रगतशील शेतकरी ♥
♥या पद्धतीत दोन प्रकार पडतात-
♥1)एकाच वर्षात कांदा व बिजोत्पादन
कांदा उत्पादनासाठी नेहमी मे जून मध्ये गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार केली जातात.
त्याची पुनर्लागण जुलै आगस्टमध्ये केली जाते.
कांदा साधारणतः आँक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निघतो.
कांदा शेतात चांगला सुकवितात व 2-3 आठवडे सावलीत पसरून त्यांना विश्रांती दिली जाते.
त्यातून जोड व डेंगळकांदे काढून सारख्या मध्यम आकाराचे कांदे निवडून बियांसाठी त्याची नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली जाते.
त्यातून कोंब फुटून प्रथम पात वर येते आणि जानेवारी-फेब्रूवारीमध्ये फुलांचे दांडे बाहेर पडतात व मे पर्यंत बी तयार होते.
कांद्याचे पीक आणि बीजोत्पादन पाठोपाठ दोन हंगामात पण एकाच वर्षात निघून येते.
महाराष्ट्रात या पद्धतीने खरीप हंगामासाठी शिफारस केलेल्या कांद्याच्या जातीचे बीजोत्पादन घेता येते. उदा. एन-53, बसवंत-780, फुले सफेद, अँग्रीफाइंड डार्क रेड, अरका कल्याण, इ. खरीपात काढलेला टोळ कांदा लगेच बीजोत्पादनासाठी लावता येतो.
त्याला साठवून ठेवण्याचा खर्च व वेळ तसेच साठवणीत वाया जाऊन होणारे नुकसान टाळता येते.
♥2)द्विवार्षिक पद्धती –
या पद्धतीत पहिल्या वर्षी उन्हाळी हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते.
त्यासाठी आक्टोबरमध्ये बी पेरून डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोपाचे स्थलांतर करतात.
मे अखेर साठवणीत मोड आलेला सडका व जोडकांदा वेचून काढून टाकतात.
सारख्या मध्यम आकाराचे बारीक मानेचे आकर्षक रंगाचे कांदे निवडून त्यांची बीजोत्पादनासाठी 15 आँक्टोबर ते 15 नोव्हेंबर याकाळात लागवड केली जाते.
जानेवारी फेब्रूवारीमध्ये फूलोरा आणि त्यापासून मे मध्ये बी तयार होते.
अशा त-हेने या पध्दतीला दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो.
रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेण्यात येणा-या एन 2-4 लाइट रेड, अग्रीफाउंड, पुसा रेड, अरका प्रगती यासारख्या जातीची बियाणे या पद्धतीने महाराष्ट्रात व भारतातील कांदा पिकवणा-या इतर बहूतेक राज्यातून घेतात.
Comments
Post a Comment