घनजिवामृत

घनजिवामृत🇮🇳 प्रगतशील शेतकरी 🏆

♥आपल्या कडे असलेले उपलब्ध शेणखत जमीन सारवुन सावलीच्या ठिकानी किंवा झाडाखाली शेतात वा जेथे सोयीचे असेल तेथे वाहुन घ्या, जिवामृत तयार करुन१०० किलोला२० लिटर या अंदाजाने त्यात जिवामृत टाकुन फावड्याने कालवुन गोणपाटाने ७२ तास झाकुन ठेवा, नंतर पसरवुन सुकवुन घ्या ढेकडे फोडुन रेतु गाळायच्या गाळणी/चाळणी ने गाळुन गोणी भरुन पाणी लागणार नाही अशा जागी ठेवा जमिनीवर लाकडी फड्या वगैरा ठेवुन त्यावर झाकुन ठेवा वर्षभरात केव्हाही वापरता येईल.      ताजे शेण असेल तर१०० किलो ला१ किलो गुळव१ किलो बेसन मिसळुन७२ तास झाकुन ठेवा, नंतर उन्हात पसरुन सुकवून गाळुन कोरड्या जागी भरुन ठेवा.        एप्रिल मे महीन्या पेरणी आधी हे तयार करुन जमीनीवर एकरी४०० किलो पसरवुन वखराने मातीत कालवुन घ्या, व पेरणी करतांना पण पेरुन द्या्
(ट्रालित किती शेणखत बसते तो अंदाज़ घेवुन तेवढे जिवामृत तयार करणे ते त्यात टाकुन झाकुन ठेवणे)  १००किलो खतात२० लिटर पहिल्यांदा च तयार केलेले ७ दिवसाच्या आत  जिवामृत किंवा जिवामृत देवुन शिल्लक राहीलेली रबडी२० लिटर टाकु शकता  
"" जिवामृत ""   जिवामृत बनवण्यासाठी एक प्लास्टिक ची टाकी किंवा सिमेंट टाकी सावलीत ठेवावी, टाकी गोल असावी, त्यात  २००लिटर पाणी घ्यावे, व त्यात देशी गाईचे ताजे शेण१० किलो+५ते१० लिटर गोमुत्र+ १ किलो काळा गुड किंवा२ते४ लिटरऊसाचा रस किंवा ऊसाचे१० किलो बारीक तुकडे किंवा देशी  गोड ज्वारीच्याधाटाचे१० किलो तुकडे किंवा १ लिटर पक्व नारळाचे पाणी किंवा१ किलो गोड फळांचा गर(चिकु, केळी, पपई,पेरु, आंबे, किन्नो)+१ते२ किलो कडधान्याचे बेसन(चवळी, चना, मुग, उडीद, हरबरा)+शेताच्या बांधावरील किंवा जंगलातील किंवा ज्या पिकास द्यायचे त्या पिकाच्या मुळ्यावरील माती यात घ्यावयाचे..    आधी२०० लिटर पाणी टाका. सुरवातीला त्या पाण्यामध्ये हाताच्या बोटाने शेण कुसकरुन फोडुन कालवुन पाण्यात मिसळा. नंतर गोमुत्र टाकाव गोड पदार्थ टाका. एका दुसर्या भांड्यात पाणी घेवुन त्यात बेसन टाका वे व हाताने मिसळुन एकजीव करावे व नंतर ते२०० लिटर पाण्यात टाकावे व सोबत मुठभर माती टाकावी. नंतर काठीने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ते द्रावण चांगले ढवळावे. नंतर त्यावर ज्युटचे बारदान(पोते) झाकुन ठेवावे. हे जीवामृत  द्रावण सावलीमध  २ते ३ दिवस किण्वन क्रियेसाठी ठेवावे. त्यावर थेट सुर्यप्रकाश पडु देवु नये. रोज सकाळसंध्याकाळकाडीने दोन मिनटासाठी ढवळावे. सछिद्र बारदानाच्या छिद्रातुन जीवामृत तयार होतांना उत्सर्जित झालेला अमोनिया, कार्बन मोनो आक्साईड, कर्बाम्लवायु व मिथेन हे वायु वातावरणात निघून जातात.४८ ते७२ तास किण्वन क्रिया चालल्यानंतर पुढे सात दिवसांपर्यंत सिंचनाच्या पाण्यासोबत त्याचा उपयोग करता येतो.७ दिवसानंतर त्याचा उपयोग करु नये जमीनीवर फेकुन द्यावे.   ‍‌‌‌‍‍‍‌👉👉 देशी गाईचेच ताजे शेण घ्या  कारण त्यातनत्र स्फुरद पालाश उपलब्ध करुन देणारे जिवाणु असतात तसेच ज्या पिकाला द्यायचे त्या पिकाच्या मुळयावरील माती घ्या कारण त्यापिकास अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारेउपयुक्त जिवाणु असतात व बांधावरील समृद्ध माती मुठभर कारण तीच्यात विविध उपयुक्त बुरशी असतात ह्या सर्व किण्वन क्रियेत वाढतात व तेच आपण जिवामृतातुन उपलब्ध करुन देत असतो  ,,,जिवामृत तयार झाल्यावर ते न ढवळता गाळुन घेणे किंवा पाटपाण्यातुन देणे, राहीलेल्या गाळात फक्त पुन्हा तेवढेच पाणी टाकुन ढवळणे व शांतझाल्यावर किंवा दुसर्यादिवशी देणे पुन्हा ईतर पदार्थ टाकण्याची आवश्यकता नाही तवढ्याच शेणगोमुत्रात असे तीन वेळा जिवामृत तयार होते परंतु हे ७ दिवसाच्या आतच देणे,, एकरी २००लिटर जिवामृत दर१५-२०दिवसांनी देणेे

♥नैसर्गिक किटक नाशके
1. निमास्त्र : 1 एकरसाठी
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. देशी गार्इचे शेन + 10 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि. लींबोळी पावडर
नोट:लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.
नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.
2. ब्रम्हास्त्र:
मोठया आळीसाठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
+ 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र
3. अग्नीअस्त्र : हे बोंड आळी, घाटी आळी साठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 500 ग्रॅम तंबाखू + 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा + 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी
हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळया येउ दया. 48
तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.हे द्रावण 3 महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी प्रती एकरी
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. अग्नीअस्त्र
4. दशपर्णी अर्क :
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा, व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रनात 10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि. तंबाखू पावडर + 1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 2 कि. करंजी ची पाने +
2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने + 2 कि. येरंडीची पाने + 2 कि. बेलाची पाने फुलासकट + 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट + 2 कि. झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची पाने + 2 कि. टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट + 2 कि. गावरान पपर्इची पाने + 2 कि.आंब्याची पाने + 2 कि.गुळवेलीचे तुकडे + 2 कि. ऋचकी ची पाने + 2 कि. कन्हेरिचे पाने + 2 कि. बाउचीच्या फांदया + 2 कि. तरोटयाची पाने + 2 कि. आघाडयाची पाने + 2 कि. शेवग्याची पाने + 2 कि. कंबरमोडी + 2 कि.जास्वंदाची पाने + 2 कि.डाळिंबाची पाने + 2 कि. हराळी
ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता, येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
बुरशी नाशके :
1. 200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
2. 100 लि.पाणी+5ते6लि.आंबटताक आंबट ताक हे बुरशी ना  शक, विषाणू नाशक, संजीवक व जंतूरोधक आहे.
3. 5 कि. रानगौरी मोगरीने बारिक करा, एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी बांधा. एक मजबूत काडी घ्या व त्या दोरीचे टोक काडीला बांधा व 200 लि. पाण्यात बुडवून ठेवा. 48 तासांनंतर पाण्यातून गाठडी बाहेर काडा व पिळून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या व फवारणीसाठी वापरा.
4. ऐका भांडयामध्ये 2 लि. पाणी घ्या, त्या मध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा.द्रावनाला आर्धे होर्इ पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया. दुसऱ्या भांडयामध्ये 2 लि. दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ दया व त्याला थंड होऊ दया.
200 लि. पाणी + सुंठ अर्क + थंड दुध
हे मिश्रण चांगले ढवळा व दोन तास ठेवा. त्यानंतर गळून घ्या व फवारणी करा. हे द्रावन 48 तासांपर्यंत वापरावे. 1 एकरास ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये
100 ग्रॅम मुग + 100 ग्रॅम ऊडीद

संकलित!
.
♥कीट नियंत्रण औषधे असे बनवाल
-------------------------------------------
आवश्यक सामग्री:-
1.निम् की पत्ती 500 ग्राम।
2.आकड़ा की पत्ती500 ग्राम।
3.सीताफल की पत्ती500 ग्राम।
4.बेशरम(नसेड़ी) की पत्ती500 ग्राम।
5.धतुरा की पत्ती 500 ग्राम।
6.रतन जोत की पत्ती 500 ग्राम।
7.महुआ 1 किलोग्राम।
8.महुआ टोली की चूर्ण 1 किलोग्राम।
9.निम् की निम्बोली का चूर्ण 3 किलोग्राम।
10 गो-मूत्र 8 लीटर।
11.पानी 20 से 25 लीटर।
नोट:-इस सम्पूर्ण सामग्री क्रमाक 1 से 11 तक को एक बडा मटका या बर्तन में 7 से 10 दिन नमी युक्त स्थान में गड्डा खोदकर रखे।फिर एक बड़े बर्तन में भट्टी पर उबाले ।इसी प्रकार 15 से 20 लीटर दवाई बनती है।
🐝आगे अलग से ये सामग्री त्यार करे:-
----------------------------
1.लहसुन की चटनी 500 ग्राम।
2.प्याज की चटनी 500 ग्राम।
3.हर्रि मिर्ची की चटनी 1 किलोग्राम(किट नियन्त्रण)।
4.अदरक की चटनी 500 ग्राम (फफूँद नाशक)।
इन सभी चटनी को अच्छे से बारीक मिक्सर में पीस लेने के बाद 5 लीटर कुन कुने पानी में मिलाकर ।पहले पत्तीयो वाले त्यार अर्क में 20 लीटर वाली दवाई में मिलाकर 16 लीटर के हेण्ड स्प्रेयर पम्प में 250 से 500 मिलीग्राम खड़ी फसलों में लगे व्हाईट फलाई (सफेद),हर्रा मच्छर,माहू(मोल्ला) इल्ली व इल्ली के अंडो
इत्यादि कीटो के नियंत्रण ही नही कीटो से फसल में पूर्ण रूप से छुटकारा मिल जाता है।साथ मित्र कीटो पर कोई विपरीत असर नही पड़ता है।
अब बनो हमारे किसान भाई आत्मनिर्भर

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!