कांदा साठवण करण्यासाठीचे ८ सोप्पे उपाय How to store Onion in 8 step
कांदा साठवण करण्यासाठीचे ८ सोप्पे उपाय. 🇮🇳 प्रगतशील शेतकरी 🏆
♥कांदा हे तसं पाहायला गेलं तर एक महत्वाचे उत्पादन.
चांगले उत्पादन आल्यानंतर सगळेच उत्पादन एकाच वेळी बाजारात विकता येईल असे नाही. मग अशावेळी महत्वाचे ठरते ते नियोजन.
नियोजन कांद्याची साठवणूक करण्याचे.
कांद्याची साठवणूक करण्याचे तंत्र नेमके काय आहे? हे जाणून घेऊया.
♥शेतीमधील प्रत्येक उत्पादन कसे साठवावे याचे शास्त्र वेगवेगळे आहे.
कांद्याच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास कांदा म्हणजे एक जिवंत वस्तू म्हणता येईल.
कारण काढणी झाल्यानंतरही कांद्याचे श्वसन सुरु असते.
कांद्यातून पाण्याचे उत्सर्जन होत असते यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
जर, असे केले नाही तर नुकसान अधिक होण्याची शक्यता असते.
यामध्ये, कांद्याला कोंब येणे, कांदा सडणे, वजन कमी होणे इत्यादी नुकसान होण्याची शक्यता असते.
यामुळेच, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करणे अपरिहार्य आहे.
असे केल्याने कांद्याचे होणारे नुकसान रोखणे शक्य नसले तरी कमी करणे शक्य आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी महत्वाची पद्धत म्हणजे कांदा चाळ बनविणे.
जर कांदा चाळ शास्त्रोक्त पद्धतीने उभारली गेली तर कांदा ४ ते ५ महिन्यापर्यंत सुस्थितीत राहू शकतो.
आणि याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना आर्थिक रुपात मिळू शकतो.
♥कांदा चाळीची उभारणी करताना साठवणूक केलेल्या कांद्याला पुरेशा प्रमाणात हवा लागणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे अशाप्रकारे कांद्याची चाळ बनविण्यासाठी अनुदानही मिळते.
♥कांदा चाळीची उभारणी करताना काय काळजी घ्यावी:
१. जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाय खोडून आराखड्यानुसार सिमेंट कॉन्क्रीटचे पिलर. कॉलम उभारणे आवश्यक आहे.
२. ज्या जागेवर कांदा साठवायचा आहे त्या जागेचा पृष्ठभाग जमिनीपासून दिड ते तीन फुट उंच असणे आवश्यक आहे.
जर एखाद्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर अशा ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडावी.
मात्र, ज्या ठिकाणी उष्ण हवामान असेल त्याठिकाणी खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील याची दक्षता घेणे फायद्याचे ठरते.
३. पिलर किंवा कॉलम वर लोखंडी खांबाच्या मदतीने चाळीचा सांगाडा तयार करावा.
४. जर एक पाखी कांदा चाळणीची उभारणी करायची असेल तर दक्षिण-उत्तर आणि दुपाखी कांदाचाळीची उभारणी करायची असेल तर पूर्व-पश्चिम करावी.
कांदाचाळीच्या छपरासाठी सिमेंटचे पत्रे किंवा मंगलुरू कवलांचा वापर करावा. जर पत्र्याला आतून बाहेरून सफेद रंग दिल्यास उष्णता मर्यादेत ठेवता येणे शक्य होते.
५. कांदा चाळीची निर्मीति करताना लांबी ४० फुट,
प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी ४ फुट रुंद,
बाजूची उंची ८ फुट,
मधली उंची ११. १ फूट,
दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंदी ५ फूट ,
कांदाचाळीची एकूण रुंदी ४ + ५ +४ = १३ फुट अशारितीने कांदा चालीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत.
चाळीची आतील कप्प्याची रुंदी ४ फुट पेक्षा जास्त नसावी.
५० मे. टन क्षमतेच्या कांदाचालीसाठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे.
६. कांद्याची साठवणूक फक्त ५ फुटापर्यंत करावी.
७. चालीच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा.
८. कांदा चाळीचे छत उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तूंनी आश्चादीत करावे.
♥कांदाचाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात.
१. कांदा चाळीसाठी पानथळ/ खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी.
२. हवा खेळती राहण्यासाठी असलेले अडथळे दूर करावेत.
३. कांदा चाळी लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये.
४. पावसाचा जोर ज्या बाजूला असेल किंवा वाऱ्याचा जोर अधिक असेल अशा ठिकाणी जागा बंद करण्याची व्यवस्था असावी.
♥या व्यतिरिक्त गरजेनुसार आवश्यक ते उपाय करावे.
♥अशाप्रकारे योग्य नियोजन करून जर कांद्याची साठवणूक केली नुकसान कमी होऊ शकते आणि यामुळे फायदा शेतकऱ्यांना होईल.
Comments
Post a Comment