वांगी किड व रोग नियंत्रण Brinjal pest & disease control
वांगी किड व रोग नियंत्रण असे कराल ♥ प्रगतशील शेतकरी ♥
1)वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय
2) फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी
3)वांगी पिकातील बुरशीजन्य रोगाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन
4) पानांवरील करपा, फळकूज, पानांवरील ठिपके आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणासाठी
5)वांगी या झांडाना जास्त फुले व कळी येण्यासाठी
♥वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय
●५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रीत करावी
●२० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे
माती परीक्षणानुसार खते द्यावीत.
♥फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी
या किडींमुळे वांगी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फिक्कट पांढ-या रंगाच्या ह्या अळ्या शेंड्यातून खोडात शिरुन आतील भाग पोखरुन खातात आणि त्यामुळे झाडाचे शेंडे वाळून झाडाची वाढ खुंटते फळे लहान असतांना अळी देठाजवळून फळात शिरुन फळाचे नुकसान करते यासाठी
●आळीग्रस्त शेंडे काढून टाकावेत.
●फवारणीसाठी क्लोरोपायरीफॉस १७ मि.ली. प्रती १०लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी अर्क ५ टक्के ची ( निंबोळी पावडर ५ किलो प्रती १०० लिटर पाणी याप्रमाणे भिजवून आर्क काढून घ्यावा ) फवारणी करावी. त्यानंतर डेमिथोएट १५मिली + नुवान ८ मि.ली. प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. त्यानंतर निंबोळी आर्काची फवारणी घ्यावी.
●शुक्ष्म अन्नद्रव्य २लीटर प्रती ३०० लीटर पाणी याप्रमाणे २० दिवसाचे अंतराने फवारणी करावी.
●डी.ए.पी. ०•५ टक्के व १३:०:४५ हे ख़त ०•५ टक्के च्या ८ दिवसाचे अंतराने फवारण्या कराव्यात.
●जमिनीतून झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्निज सल्फेट १० किलो प्रत्येकी व बोरँक्स २किलो प्रती एकर प्रमाणे शेणखतासोबत द्यावे.
●लैगिक गंध सापळे ५ प्रती अर्धा एकर प्रमाणे लावावीत त्यातील गोळी दर १५ दिवसांनी बदलावी.
●प्रकाश सापळे १ प्रती अर्धा एकर क्षेत्रात लावावा.
●जिवाणू खते अझाटोबँक्टर २ किलो + पी.एस.बी. २ किलो + शेणखत मिसळून जमिनीतून द्यावे.
♥वांगी पिकातील बुरशीजन्य रोगाचे
एकात्मिक रोग व्यवस्थापन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
●रोगाचा प्रादुर्भाव झालेले रोगग्रस्त पाने सडलेले, किडके फळे गोळा करून बांधावर किंवा प्लॉट शेजारी उघड्यावर न टाकता जाळून नष्ट करावे.
●पानांवरील करपा, फळकूज, पानांवरील ठिपके आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन १० ग्रॅम अथवा डायथेन एम-४५, २५ ग्रॅम यांपैकी एक औषध, परंतु आलटून पालटून १० लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
●भुरीसाठी पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम वरील औषधात मिसळून फवारणी करावी.
●जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर केला नसल्यास लागवडीनंतर किंवा रोगाची लक्षणे दिसताच बाविस्टीन १० ग्रॅम बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण साधारणतः ५० ते १०० मि.लि. झाडाच्या बुंध्याभोवती रिंग करून १५ दिवसांच्या अंतराने दोनदा ओतावे.
♥वांगी या झांडाना जास्त फुले व कळी येण्यासाठी
●एन.ए.ए.या संजीवकाची २० पी.पी.एम (२० मिली. १ लीटर पाण्यात) पीक फुलो-यावर असताना फवारणी केल्यास फळांची वाढ चांगली होउन उत्पादन वाढते.
●वांग्याचे उत्पादन जास्त मिळविण्यासाठी आणि फळगळ कमी करण्यासाठी कार्बेन्डँझिम (०.१ टक्के) तीन फवारण्या फळ लागल्यापासून एक महिन्याच्या अंतराने कराव्यात.
●मावा, तुडतुडे किडी व रोग नियंत्रणासाठी रोगर १०मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा कार्बारील २० ग्रॅम यापैकी एक औषध बदलून १० लिटर पाण्यातून फवारावे. ५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी करावी.
संकलीत
वागी किडकी झाली आहे
ReplyDeleteस्पिन्टोर चि फवारणी करावी 7 मिली 20 लीटर पाण्यातून
Deleteफुल गळ होउ राहीले
ReplyDeleteदेटावर व पानावर टिपके देट तांबट झाले आबेत
ReplyDeleteमवा जास्त आहे आणि तिखटपणा आहे
ReplyDeleteVangyachya zhadala
ReplyDeleteKhod kidi lagli aahe
Four.five.navache insectside fovarani kara
Deleteवांग्यावरील किड कमी होत नाहीय... Coragen आणि Amnon ची देखील फवारणी केली तरी किड कमी होत नाही..उपाय सांगा
ReplyDeleteवांगीच्या बुरशिसाठी उपाय सांगा झाडे मरत आहे
ReplyDeleteWangyachya zadala khodkid lagali ahe upay sanga
ReplyDeleteवांगी शेंडअाळी फळातील आळी उपाय सांगा 3महिण्याची आहेत सर
ReplyDeleteवांगी बुरशी उपाय काय
ReplyDeleteवांग्याच्या बुरशी साठी
ReplyDeleteजमिनीतील बुरशी व मरी साठी
संध्याकाळया वेळी झाडांचे शेंडे सुकल्यासारखे दिसतायत कशामुळे का शेंडे आळीचा अटॅक आहे
ReplyDeleteखोड अळी आहे कोणती फवारणी करावी
ReplyDeleteवांगी पूर्ण वाढ होण्यापूर्वी पिवळी पडतात
ReplyDeleteशेंडे अळी आहे
ReplyDeleteDear sir
Deleteuse VBL-Thunder + VBL-Wonder
ReplyDeleteCall Nitin on 9822196099
वांगातील बरशी कमी येत नही
ReplyDelete