बैल पोळा - शेतकर्याच्या निस्वार्थी मित्राविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण!
बैल पोळा - शेतकर्याच्या निस्वार्थी मित्राविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण! ♥प्रगतशील शेतकरी♥ ♥पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते. ♥श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' ♥या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउ