स्वामी बरोबर आहेतच. Swami is always with us.
श्री स्वामी समर्थ
अनेक माणस आपल्याला भेटत असतात.चालता बोलता माणसांचे स्वभाव , त्यांच्या नाना तर्हा , प्रवृत्ती खूप काही पहायला , अनुभवायला येत.
गंमत अशी की व्यक्तीनुसार समस्या , संकटं , कारण वेगवेगळी असली तरी बहुतांशी त्यांच मूळ हे सारखच असत.
त्यापैकीच एक म्हणजे ' सहनशीलता ' .
" मीच म्हणून टिकले , दुसरी कोणी असती तर केव्हाच सोडून गेली असती .....वगैरे वगैरे तर घराघरात निनादत.
इतर नात्यांत , कामाच्या ठीकाणी सगळीचकडे मला सहन करावं लागत ही प्रबळ समजूत असते.
ती मिरवण्यात भूषण वाटत. आपल्या वाट्याला आलेल्या भोगांची जाणीव किंवा आपले भोग इतरांना कळावे ही भावना बहुतांशी आढळून येते.
कितीजण समजूतदारपणा आहे म्हणून किंवा प्रेमासाठी सहन करतात आणि कितीजण दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून सहन करत. रहाण्याचा समजूतदारपणा दाखवतात ???? .
त्यातही पावलोपावली नशीबाला कोसत रहाण नाहीतर देवाला दोष देणं सुरुच असत.
बस , ट्रेन , गाडी लिफ्ट काहीही असो , प्रत्येक यंत्राची वजन सहन करण्याची कमाल मर्यादा ठरलेली असते.क्षमतेनुसार क्षमतेपर्यंत ही यंत्र कुरकूर न करता काम करत रहातात.
पण आपण तर माणस आहोत पण जरा काही झालं की आपल्या कुरबुरी सुरु होतात.
थोड जरी आपल्या मनाविरुद्ध झाल , आपलं काही नुकसान होतय हे दिसल , आपल्याला नेहमीपेक्षा वेगळं वागावं लागणार तेसुद्धा दुसर्यासाठी अस झालं की आपली सहनशीलता लगेचच डोकं वर काढते.
लहान असताना आम्ही गावी जायचो. खाली पर्याजवळ विहीर होती , तीथून पाणी भरावं लागे. गडीमाणसांबरोबर आई काकू देखील पाणी भरु लागायच्या.मोठमोठे हंडा कळशी भरुन. चढ चढायच्या.
आम्हालाही हौस असायची मग पेलवेल अशी छोटीशी कळशी थोडी भरुन काकू ती कमरेवर ठेवायची. मोठ्या उत्साहात आम्ही पाणी भरायचो.जरा मोठी कळशी भरुन घ्यावी म्हटल की दमछाक व्हायची.कधीकधी दाखवण्यासाठी हट्टाने पाणी डचमळवत वर पोहोचेपर्यंत कळशी अर्धी झालेली असायची.
आपल्या आयुष्यात आपण "मी सहन करतो " अस जे म्हणतो ते असच आहे नाही का !!!
जोपर्यंत आपल्याला पेलवत असत तोपर्यंत काही सहन करतोय हे काही नसतच.मात्र जरा जरी एखादा हंडा जास्त डोक्यावर आला की हे त्रासदायक असल्याची तत्काळ जाणीव होते.
तर मग आपण सहन करतो अस जे सतत म्हटल जात ते योग्य आहे का ! नुकती कुठे सुरवात झालेय , थोड वजन वाढलय त्या सुरवातीलाच सहन करण अस आपण म्हणतो.
खरतर क्षमतेबाहेर काही आहे म्हणण्याकरता आपण यंत्र नाहीत तर माणस आहोत.
बुद्धीचं वरदान लाभलेली , प्रत्यक्ष भगवंताचा वास जीथे आहे असा दुर्मिळ मनुष्यदेह लाभलेली आपण सारीच भाग्यवान माणस आहोत.
आपल्या मनाकडे अचाट सामर्थ्य आहे. पेलण्याची क्षमता आहे.
आपण भौतिक पसार्यात एवढे गुरफटून गेलो आहोत की ह्या सामर्थ्याची जाणीवच कधी होवू शकत नाही.
खर दुखणं हे समस्या संकटांच नसत तर ते आहे मनाच्या चुकीच्या सवयींच.
ह्या सुखासीन सवयी , नाशिवंताच्या मागे धावणार्या सवयी , जे कायम रहाणार सुख नाही अशा सुखाला पकडीत ठेवू पहाणार्या चुकीच्या सवयी आपलं खच्चीकरण करतात.
संकट आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ भासवतात , प्रारब्ध भोग सहन करण्याचं धैर्य नाकारतात.
आयुष्यातली सर्व भौतिक सुखदु:ख वाटेत लागणार्या स्टेशनांसारखी आहेत.येणार आणि जाणार.त्याची काळजी नको , भिती तर नकोच नको.
धान्यातली फोलपटं कशी फुंकर घातली की उडून जातात तसेच हे भोग आहेत.नामाची फुंकर घाला की निघून जातील.
अशीही आयुष्य आहेत की वर्षानुवर्ष संकट पाठ सोडतच नाहीत , पाचवीला पुजल्याप्रमाणे समस्या ठाण मांडूनच आहेत.
अशी माणस जर सहन करतो म्हणतात तर चुकीचही नाही , परंतु आपणच प्रामाणिकपणे पहाव की सहन करतोय म्हणजे मानसिक बळ वाढलच पाहिजे.
अस होत नसेल तर आपण सहन करतो म्हणण उगाच आहे.
" प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे " ही प्रचीती तेव्हाच येते जेव्हा खरोखर सहन करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतो.
परमार्थात प्रगती व्हावी वाटत असेल तर सहनशीलता ही नामी मैत्रीण आहे.
स्वामींसाठी , त्यांच्याजवळ जाण्यासाठी , त्यांच्याजवळ रहाण्यासाठी सहनशीलतेतच ते अमाप सुख आहे.
म्हणून सोसेल एवढच दु:ख असावं याची काळजी समर्थाला आहेच पण जेव्हा सोसवत नाही अस वाटत तेव्हा आपल्यापाशीच असणारं सामर्थ्य जाणण्याची ती कसोटी असते.ती खिलाडूपणे स्वीकारायला शिकलं तर मनुष्यजन्माची मजा , कष्टातून मिष्ट कसं आपोआप मिळत ते सुख अनुभवता येईल.
स्वामी बरोबर आहेतच.

Comments
Post a Comment