भगवंताचा ध्वनिरूप अवतार ‘नामस्मरण’

भगवंताचा ध्वनिरूप अवतार ‘नामस्मरण’


।। ॐ विपरीत प्रत्यंगिरे नमः ।।.....मित्रहो , काही दिवसांपूर्वी एक नामस्मरण विषयक पोस्ट केली होती , त्यात एक व्यक्तिने मेसेज बॉक्स मध्ये लिहिले होते की , fb व् whatsup वर जे रोज दिवसातून सतरावेळा साधू संताचे फ़ोटो टाकतात ती त्याची सेवा आहे , स्वामीना लोकां पर्यन्त पोचवन्याची ........ ही कमेंट वाचून खरोखर कपाळावर हात मारला , म्हटल हा अजुन आउट ऑफ़ कव्हरेज एरिया आहे . अस कोणी सांगितल की देवाचे फ़ोटो रोज सतरा वेळ पोस्ट केल्याने सेवा होते , देव व् संत ज्याच्या त्याच्या प्रारब्ध नुसार बरोबर पोचतो आणि त्यांना पूर्ण विश्वाचा कारभार बघावा लागतो.....वरची कमेंट ही भोळसट पनाच्या श्रद्धेत मोड़ते ज्यात काही तथ्य नाही.....त्याएवजी स्वत् च्या शरीर व् आत्मा यांची उन्नति कशी होईल याचा मार्ग शोधून काढल्यास न जानो एखाद्याच् पुर्व प्रारब्ध जाग्रत झाल तर व्यक्ति कमी काळात आध्यात्मिक उच्च टोकावर जाउ शकते. हा जन्म आपला , त्यावर पूर्वकर्म बंधन आहे म्हणून या जन्मात आध्यात्मिक मार्ग सहज सोपा नाही आनी तेवधा कठिन ही नाही , माणसाच आयुष्य मुळात आहेच किती ? अजुन आपली 25 शी येई पर्यन्त अककल येत नाही नंतर करियर लग्न मूल........यात खरा अध्यात्मासाठी वेळ किती मिळतो? त्यात आपन कितिसा वेळ फुकट घालवतो , कोणी महनेल की मी हजार पारायण आणि करोड़ भर जप केला .....तर त्याने देव प्रगट होवून कसला दृष्टान्त देनार नाही , ....... भगवन्त एक खुप मोठी परीक्षा आहे , अनेक जन्मांचि ! आपन कलियुगात आहोत म्हणून ईश्वराच माया रूप अधिक प्रभावी आहे , या माया स्वरूपास जो कोणी सत्य ओळखेल त्याने या जन्माच सार्थक झाल्याचे म्हणाव्यास हरकत नाही................आपली शक्ति वाढवन्यासाठी स्वार्थी व्हा . स्वार्थ म्हणजे काय कोणता ? तर हेच आपन फुकट वेल घालवतो त्यावेळी नामजप करने , ध्यान करने , इश्वराशि एक रूप होवून त्यांच्याशी बोलने ....मग हे सर्व करताना काही गोष्टी बाजूला ठेवण ही आवशयक...... आपन जे फ़ोटो आणि बॅनर तयार करुण लोकांच्या साठी लावतो ते लोक का ? आपल्याला ईश्वाराचा मार्ग दाखवनार? असे असते तर गुप्त रूपाने इतक्या साधू संताना हिमालयात् रहावे लागल नसत.........आपल्याला स्व शरीर व् आत्मा यांच्या उन्न्नति चा स्वार्थ लागला पाहिजे.........तर.....
नामस्मरणाने ‘गुप्त’ असणार्‍या भगवंताला अगदी सहज शोधून काढता येते. आपले घर सोडून कुठेही जंगलात, एकांत जागी, हिमालयात जावे लागत नाही. ‘ठायेचि बैसोनि करा एकत्रित
|’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती घेता येते. हा अभंग मात्र आचरणात आणावा लागतो. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, संत नामदेव, मीराबाई, गोराकुंभार, सावतामाळी, चोखोबा, रामदासस्वामी, तुकाराम महाराज आणि अगदी अलीकडील संत गोंदवलेकर महाराज या सर्व संतांनी हाच मार्ग चोखाळला आहे. भगवंताला शोधून काढणारी हीच मंडळी आपल्यालाही ‘नामस्मरण करा!’ अशी शिकवण देत असली, तरी आम्ही मात्र ‘नामस्मरण’ सोडून इतर सर्व करीत राहतो. इथेच आमची अध्यात्मातील गाडी अडून बसते. यातून मार्ग काढण्यासाठीच हा लेखन प्रपंच!
अध्यात्मातील सिद्धांतानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती या सर्वांचा भगवंताच्या नामाशी थेट संबंध असतो, म्हणूनच जेथे भगवंताचे ‘नाम’ आहे तिथे या सर्वांची अनुभूती येतेच. सर्व संतांनी याच न्यायाने नामस्मरणातून भगवंताला प्रकट केलेले आहे. भगवंताचे नाम स्वयंभू आहे.
भगवंताच्या नामातच त्याची सर्व शक्ती नित्य वास करीत असते हेच आपण विसरून जातो; म्हणून आपण ‘नाम’ घेत नाही. रोजच्या जीवनातील ७०% वेळ आपण फालतू वाया घालवत असतो. हाच वेळ नामस्मरणाला दिल्या गेला, तर आपण स्वत:च ‘संत’ झाल्याशिवाय राहत नाही.
मनुष्ययोनीतच साधू, महंत, संत, गुरू, सद्‌गुरू, परात्परगुरू असा प्रवास करता येऊन, मानव परब्रह्मापाशी (श्रीकृष्ण रूपाशी) थेट जाऊन पोहोचू शकतो; म्हणूनच स्वर्गातील देवांनाही मनुष्याचा सारखा ‘हेवा’ वाटत असून, या देवताच मनुष्याच्या साधनामार्गात अडथळे आणत असतात. अज्ञानामुळे आपण म्हणतो की, ‘देव परीक्षा घेतो.’ स्वर्गातील देवता या साधनेसाठी मनुष्याला रोखण्याचा प्रयत्न करीत असतात; म्हणूनच खर्‍या साधकाच्या मार्गात अनेक विघ्ने येतात. ध्रुवबाळाच्या साधनेतील सर्व अडथळे हा याचा पुरावाच आहे. दुसरे उदा. भक्त प्रल्हादाचे आहे.
आपल्या कर्माचा देवाण-घेवाण हिशोब, (संचित व प्रारब्ध) पूर्ण होणे, आपला देहाभिमान नष्ट होणे आणि सर्वात महत्त्वाचा आपला ‘अहंकार’ संपूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय कितीही प्रयत्न केले, साधना केली, तरीही परमेश्‍वरापर्यंत पोहोचताच येत नाही. हे एक वर्म, तर ‘गुरुकृपेविण काहीच नोहे
|’ हे दुसरे वर्म लक्षात आले की, नामाच्या गाडीत बसून ईश्‍वराचे स्टेशन गाठता येते. आपण जिंकतो...
आज खंत वाटते , कलियुगात खुप संत झालेत पण त्यांचे अवतार मर्म अगदी कमी लोकांना समजले , तुमिहि त्या कमी लोकांत मोडावे ही अपेक्षा....................
आमच्या लिखानावर टिका करणार्यांचे स्वागत राहील.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!