सद्गुरूविण समाधान। आणीक नाही।। ~दासबोध द.७, स.१०

सद्गुरूविण समाधान। आणीक नाही।।


परमार्थाचे जन्मस्थान। तेचि सद्गुरूचे भजन।
सद्गुरूभजने समाधान। अकस्मात बाणे।। श्रीराम।।

देह मिथ्या जाणून जीवे। याचे सार्थकचि करावे।
भजनभावे तोषवावे। चित्त सद्गुरूचे।। श्रीराम।।

शरणागतांची वाहे चिंता। तो येक सद्गुरू दाता।
जैसे बाळक वाढवी माता। नाना येत्ने करूनि।। श्रीराम।।

म्हणौन सद्गुरूचे भजन। जयासि घडे तो धन्य।
सद्गुरूविण समाधान। आणीक नाही।। श्रीराम।।

~दासबोध द.७, स.१०

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!