नामस्मरणाचे फायदे Benefits of taking God's name

नामस्मरणाचे फायदे -

एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय !
शिवाचा नामजप -
‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.
श्रीरामाचा नामजप -
‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ‘जय राम’ व त्यानंतरचा ‘जय जय’ मधील दुसरा ‘जय’ हे शब्द म्हणतांना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ‘श्रीरामा, मी तुला पूर्णत: शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.
मारुतीचा नामजप -
' हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट ' हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.
गणपतीचा नामजप -
‘ॐ गं गणपतये नम: ।’ (श्री गणेशाय नम:) हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नम:’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.
दत्ताचा नामजप -
‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा.
श्रीकृष्णाचा नामजप -
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपातील ‘नमो’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. ‘भगवते’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘वासुदेवाय’ हा शब्द म्हणावा.
नामस्मरणाचे फायदे -
१) एकाग्रता वाढते
२) चित्तशुद्ध होते
३) वाचासिद्धी प्राप्त होते
४) दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.
५) मन कायम आनंदी राहते.
६) सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!