शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे ?
शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे ?♥प्रगतशील शेतकरी♥
♥दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात.
♥महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.
♥१७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट भारतभर करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.
♥जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात.
♥ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.
♥सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.
♥द्राक्षाची एप्रिल, ऑक्टोबर छाटणी लवकर घेऊन रमजान व नाताळाला द्राक्ष आखाती राष्ट्र व युरोप राष्ट्रात निर्यात करता येतात. तसेच महिनाभर अगोदर द्राक्ष काढल्यामुळे पाणी, मजुरी, खत, औषधे यांच्यात बचत होते.
♥रमजान, नाताळ व इतर सणांसाठी कलिंगड व खरबुजाची लागवड सलग किंवा आंतरपीक (डाळींबात किंवा शेवग्यात) घेतले तर रमजान किंवा नाताळाला देशांतर्गत मार्केटमध्ये निर्यातीस उपलब्ध होतात. हा अनुभव भारतभर शेतकऱ्यांनी घेतला आहे.
♥गणपती झाल्यानंतर पितृ पंधरावड्यामध्ये विविध प्रकारची भाजी यावी. यासाठी नियोजन करून उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.
संकलित!
Comments
Post a Comment