गहू लागवड नियोजन

गहू लागवड नियोजन असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥

♥गहुचे सुधारीत वाणाची निवड

>गहुचे जिरायत वाण

अ) बन्सी- एन-५९,
ब) सरबती- एन-८२२३,
एन,५७४९ आणि
एन.आय.५४४९,
एन.आय.डी.डब्ल्यू.१५(पंचवटी)
------------------------------------------
>गहुचे बागायत वाणाची निवड

गहु वेळेवर पेरणी –

एच.डी.२१८९,
एच.डी.-२२७८,
एच.डी.-२३८०,
डी.डब्ल्यू.आर.१६२,
एम.ए.सी.एस.२४९६,
एम.ए.सी.एस-२८४६,
एन.आय.ए.डब्ल्यू.३०१(त्र्यंबक),
एन.आय.डी.डब्ल्यू-२९५(गोदावरी)

गहु उशीरा पेरणी –

एच.डी-२५०१,
एच.आय-२७७ आणि
एन.आय.ए.डब्ल्यू.-३४
----------------------------------------------
♥गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा.

♥हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे.

♥जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा.

♥गव्हाची पेरणीची वेळ –

जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी.

बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.

त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.

♥ पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.

♥उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.

पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी.

म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.

♥जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.

♥ गहु बियाणे –

गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे.

यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.

- उशीरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी.

- जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

♥खते –
अ) हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे.

ब) बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.

क) उशीरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खते वरीलप्रमाणेच दोन हप्त्यात द्यावे.

ड) जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.

इ) पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!