हरभरा मर व हुमणी नियंत्रण असे कराल
हरभरा मर व हुमणी नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥
♥रोगाच्या नियंत्रणासाठी ज्या शेतात नेहमी रोपांची मर होत असते त्या शेतात हरभरा लागवड करु नये.
इतर ठिकाणी लागवडीपुर्वी बियाण्यास रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया करावी.
♥मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे.
♥मर रोगाला कारणीभुत बुरशी फायटोप्थोरा
ज्या जमिनीत जमिन कोरडी झाल्यानंतर तडे पडतात अशा जमिनीत या रोगाची लागण जास्त प्रमाणात होते.
या रोगाची लागण बुरशी सारख्याच Phytophthora medicaginis उमायसिटी या गटातील सुक्ष्मजीवा मुळे होते.
या रोगाची लागण रोपाच्या कोणत्याही अवस्थेत जसे बाल्यावस्था, वाढीचा काळ, फुलोरा अवस्था, फळ धारणा या सर्वच अवस्थात होते.
रोप मलुल होवुन मरते, पाने पिवळी पडतात. रोगाची लागण झाल्यानंतर जर हवामान थंड असेल आणि जमिनीत पाणी असेल तर रोगाची लक्षण दिसण्यास काही कालावधी लागतो. रोपाच्या मुळांची वाढ होत नाही, मुळांची संख्या कमी असते, तसेच रोपाची वाढ खुंटते. फायटोप्थोरा जमिनीत उस्पोअर्स च्या स्वरुपात अगदी १० वर्षांपर्यंत सुप्तावस्थेत राहु शकतात.
कधी कधी ते क्लायमॅडोस्पोअर्स च्या स्वरुपात देखिल सुप्तावस्थेत राहतात.
ज्यावेळेस जमिनीत पाणी असते, त्यावेळेस हरभरा पिकाच्या मुळातुन स्त्रवणारा विषिष्ट द्रव उस्पोअर्स ची सुप्तावस्था मोडतो, आणि त्यापासुन झु स्पोअर्स तयार होतात.
झु स्पोअर्स मुळांमध्ये शिरतात आणि रोपाच्या अन्नसाठ्यावर जगतात.
-------------------------------------------------------------------------
हुमनिचे नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी ♥
♥हुमणीने केलेल्या नुकसानीचे स्वरूप लक्षात घेता उभा पहारीने पिकाच्या बुंध्यालगत खड्डा काढावा.
♥४० मिलि क्लोरपायरिफॉस १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.
फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत तयार केलेल्या खड्ड्यात या द्रावणाची आळवणी करावी
किंवा
एकरी १० किलो फोरेट (१० जी) किंवा १० किलो फीप्रोनिल (दाणेदार) हे १० किलो मातीत मिसळून कच्च्या घातीवर टाकावे.
♥नुसते सरीतून कीटकनाशक सोडून हुमणीचे नियंत्रण होणार नाही.
कारण, हुमणी ही बोधात असते.
त्यामुळे पिकाच्या बुंध्यालगत केलेल्या खड्ड्यात या कीटकनाशकाच्या द्रावणाची आळवणी करावी.
संकलित!
Comments
Post a Comment