ऊस लागवड नियोजन असे कराल
ऊस लागवड नियोजन असे कराल ♥प्रगतशील शेतकरी♥
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥ ऊस लागवड अंतर असे ठेवावे
५ फुटी पट्टा पध्दतीने एकरी ७ हजार एक डोळ्याची
६ हजार दोन डोळ्याची टिपरी वापरावी दोन डोळ्याचे टिपरे २० सेमी अंतर तर १ डोळ्याचे १ फुट अंतरावर पट्टा पध्दतीने लावावे.
♥ ऊस बेणे प्रक्रीया अशी कराल
बियाण्यास १०० लिटर पाण्यातून
+
३०० मिली मॅलेथिऑन व
+
२५० ग्रॅम बावीस्टीनची प्रक्रीया करावी,
ही प्रक्रीया ड्रममध्ये कांडे बुडवून करावी
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥ऊस वाणाची निवड अशी करावी
ऊस वाणाची निवड करताना, आपण महाराष्ट्रातील कोणत्या भागात उस लागवड करणार आहोत हे लक्षात घेऊन योग्य जात निवडावी.
तसेच आपण ज्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येता त्या कारखान्याची शिफारस लक्षात घ्यावी.
वर्षभरातील विविध हंगामात उसाची लागवड केली जाते, हंगामावरून केल्या जाणार्या लागवडीवरून सुरु, आडसाली व पूर्व हंगामी अशी नावे देण्यात आली आहेत.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥उस लागवडीसाठी खालीलप्रमाणे लागवड हंगाम निवडावा
★सुरू- १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी.
★पूर्वहंगामी-१५ आक्टोबर ते १५ नोव्हेंबर.
★अडसाली- १५ जूलै ते १५ आगस्ट.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥ऊस पिकाच्या प्रचलित जाती
★पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने सुरू हंगामासाठी शिफारशीत केलेले वाण -
को 86032 (नीरा)
को 94012 (फुले सावित्री)
कोएम 0265 (फुले - 265)
कोसी 671
को 8014
को 7527
को 92005
आडसाली हंगामासाठी शिफारशीत केलेले वाण -
को 86032 (नीरा)
कोएम 0265 (फुले - 265)
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥ऊसामध्ये घ्यावयाचे आंतरपिक
आंतर पिक सोयाबिन, मुग, उडीद घेता येते.
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥ऊस खतांचे नियोजन असे कराल
पेरणीवेळी -
१० टन शेणखत व
+
१०० किलो युरीया,
२०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट
+
म्युरेट ऑफ पोटॅश तसेच
+
२०० किलो निंबोळी पेंड
+
५ किलो झिंक सल्फेट
+
१० किलो फेरस सल्फेट
+
२ किलो बोरॅक्स
+
५ किलो मॅग्नीज सल्फेट या खतांच्या वापर करावा.
शेणखतातून एकरी ४ किलो प्रत्येकी अझाटोबॅक्टर व पी.एस.बी. द्यावे
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
♥ऊस बियाणे उपलब्धता!
१) कृषि विकास प्रतिष्ठान, बारामती
२) ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव जिल्हा - सातारा
३) वसंतदादा ऊस संशोधन केंद्र, मांजरी जिल्हा - पुणे
(प्रगतशील शेतकरी ग्रुप, श्री भूषण विश्वासराव खैरनार 09422895411)
(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी)
संकलित!
Comments
Post a Comment