तुर उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापन
तुर उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापन♥प्रगतशील शेतकरी)
♥पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन संच, रासायनिक खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा व विविध फवारणींचा प्रभावी वापरावर लक्ष द्यावे.
♥तुरीचे चांगले उत्पादन मिळावे म्हणून योग्य वाणाची निवड करावी.
♥पेरणीपूर्वी प्रति किलो
बियाण्यास दोन ग्रॅम थायरम
+
दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम याची प्रक्रिया करावी.
त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियमची प्रक्रिया करावी.
♥तुर खत नियोजन करण्यासाठी माती परिक्षण व त्यानुसार खत नियोजन करावे.
खत व्यवस्थापन -
सलग तुरीसाठी माती परीक्षण अहवालानुसार हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.
मिश्र पीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खतमात्रा द्यावी. उदा. सोयाबीनकरिता 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.
♥माती परिक्षण अभावी शेतकरी अनुभव तंत्र वापरुन उत्पन्न वाढवावे(हे करताना आवश्यक खत मात्रा वापरावी).
तूर लागवड करण्यापूर्वी पिकाला भरपूर शेणखत टाकले.
♥तुर उत्पादन वाढीसाठी या गोष्टींकडे लक्ष द्यावे
- ठिबकचे पाणी वाफसा स्थितीत द्यावे.
- थोड्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्याचे वेळीच नियंत्रण करावे.
- रासायनिक खते, पाण्याचे नियोजन, बियाणे या गोष्टींवर भर द्यावा.
- बियाणे चांगलेच पाहिजे. त्यामुळे उत्पादन चांगले मिळते.
- फवारणीचे योग्य नियोजन ठेवावे.
- मधमाश्या येऊन परागीभवन चांगले होते.
♥पेरणी करताना 10:26:26 खताच्या एकरी दोन बॅगा टाकाव्यात.
♥पेरणीनंतर तीस दिवसांनी पुन्हा 10:26:26 खताची एकरी अर्धा बॅग,
साठ दिवसांनंतरही एकरी अर्धा बॅग व
नव्वद दिवसांनी एकरी एक बॅग, याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर करावा.
♥पीक लहान असताना सूक्ष्म अन्नद्रव्य एकरी दहा किलो व सल्फर एकरी दहा किलो प्रमाणे द्यावे.
♥तूर रोग नियंत्रण :
मर आणि वांझ हे तुरीवरील महत्त्वाचे रोग आहेत.
वर्षानुवर्षे एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वाणांची लागवड केल्यास फ्युजेरीयम नावाच्या बुरशीची जमिनीत वाढ होते व मर रोग उद्भवतो.
त्यामुळे पीक दोन महिन्याचे असताना पाने व फांद्या सुकू लागतात आणि नंतर संपूर्ण झाड वळून जाते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगांना प्रतिकारक वाणांची लागवड करावी.
रोगग्रस्त झाडे शेतातून उपटून नष्ट करावीत.
पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायको या परोपजीवी बुरशीची ५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणेप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
तसेच उन्हाळयात जमीन खोल नांगरावी. त्यामुळे सूर्यप्रकशामुळे बुरशी मरून जाईल.
♥आंतरमशागत -
पिकात 15 ते 20 दिवसांनंतर कोळपणी करावी. पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30-45 दिवस शेत तणविरहित ठेवावे.
♥याच काळात ठिबक सिंचन संचातून ह्यूमिक ऍसिड एकरी दोन लिटर द्यावे.
पाणी व्यवस्थापन -
तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामातील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते.
तथापि, पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास
पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये (30 ते 35 दिवस),
फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (60 ते 70 दिवस) आणि
शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
♥त्यानंतर पंधरा दिवसांनी 19:19 :19 एकरी पाच किलो द्यावे.
♥तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना 12 :61 :0 एकरी पाच किलो,
तुरीची शेंग परिपक्व होताना 0:52:26 एकरी पाच किलो द्यावे.
फवारणी करताना वेळोवेळी बुरशीनाशकाचा वापर करावा.
पेरणीनंतर पंधरा दिवसांनी फवारणीचे नियोजन करावेत.
♥फूलगळ होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने प्लॅनोफिक्सची फवारणी करावी.
पेरणीनंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने 110 दिवसांनी लिव्होसीनची फवारणी करावी.
♥तुरीची पाने जमिनीवर गळून पडल्याने जमीन कसदार बनते व जमिनीचा पोत सुधारत असल्याचे दिसून आले.
तुरीत मक्याच्या चाऱ्याबरोबर उडीद, मूग, सोयाबीन इत्यादी आंतरपिकेही त्यांनी घेतली होती.
(वरिल शिफारसीचा स्वजबाबदारीवर वापर करावा!)
संकलित!
Ok
ReplyDeleteVery useful article
ReplyDelete