शेवग्याच्या प्रमुख वाण व त्यांची वैशिष्टय़े
शेवग्याच्या प्रमुख वाण व त्यांची वैशिष्टय़े♥प्रगतिशील शेतकरी♥
♥ शेवग्याच्या प्रमुख वाण व त्यांची वैशिष्टय़े
रोहित-१
जाफना
कोकण रुचिरा
पी. के. एम. १
पी. के. एम. २
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥ रोहित-१
शेवग्याच्या अनेक जाती आहेत.
त्यात पी.के.एम.- १, पीकेएम २, कोकण रुचिरा, धारवाड सिलेक्शन, चेम मुरुगाई इत्यादी वाणांचा समावेश होता;
परंतु वरीलपैकी सर्व जातींमध्ये काही ना काही दोष होते.
रोहित-१ हा वाण रंग, चव व गुणवत्ता यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे.
या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते.
शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ व गोल आहेत.
रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे.
उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे.
व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे.
असे असले तरी या वाणाचे ११ वर्षे वयाचे झाड चांगले उत्पन्न देते.
वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते.
शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात.
सद्यस्थितीत व्यापारी लागवडीसाठी रोहित ही जात सर्वश्रेष्ठ आहे.
♥ जाफना -
हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे.
देशी शेवगा म्हणून ओळखतात.
या वाणाच्या शेंगा चवदार असतात.
या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते.
ती २० ते ३० सें.मी. लांब असते.
या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात.
मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा मिळतात.
एक किलोत २० ते २२ शेंगा बसतात.
दर झाडी एक हंगामात १५० ते २०० शेंगा मिळतात.
चवीला चांगली.
बी मोठे होतात.
♥ कोकण रुचिरा -
हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे.
कोकणासाठी शिफारस केला आहे.
झाडाची उंची ५ ते १६ मीटर.
या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात.
शेंगा गर्द हिरव्या रंगाचे असतात.
या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते.
शेंगा या एका देठावर एकच लागते.
या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात.
साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते.
दर झाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्के उत्पन्न मिळते.
♥ पी. के. एम. १ -
हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे.
या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत.
१) रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात.
२) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात.
३) या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोन वेळा शेंगा येतात.
४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही.
५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात.
६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
♥ पी. के. एम. २ -
हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे.
हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतर पीक शेवगा शेतीत आहे.
१) शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे.
२) भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात हा वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामात ओलीता खाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात.
३) या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत.
४) सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सें. मि. लांब येतात.
५) लांब शेंगा वजनदार शेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जादा मिळतो.
६) एका झाडाला एकाच हंगामात २१९० शंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला.
७) या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही.
८) बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.
९) सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.
थोडक्यात, पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढवणे, जोपासणे योग्य आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♥या वरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात.
१) दत्त शेवगा कोल्हापूर,
२) शबनम शेवगा,
३) जी.के.व्ही.के. १ व जी.के.व्ही ३,
४) चेन मुरिंगा,
५) चावा काचेरी.
मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम व चव आणि लांबी या दृष्टीने पी.के.एम. २ सर्वश्रेष्ठ आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शेवगा लागवडसंबधी काही महत्वपूर्ण मुद्दे
♥अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा
♥जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते.
♥महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे.
♥शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते.
♥शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.
♥मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही.
♥फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते.
♥शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर-ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी.
♥महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते.
♥शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे.
♥वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो
व
फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात.
♥शेवग्याची छाटणी, खत, मात्रा व्यवस्थापन याचं स्वतंत्र तंत्र तयार करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
संकलित!
Comments
Post a Comment