तुर लागवड व्यवस्थापण
तुर पिकासाठी करावयाचे खत व्यवस्थापण♥प्रगतशील शेतकरी♥
♥तुरीची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे खोल नांगरणी आणि वखराच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी.
♥शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी 20 गाड्या चांगले कुजलेले कंपोस्ट खत/शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
♥पेरणीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 कि.ग्रॅ. नत्राची मात्रा देणे आवश्यक आहे.
♥पेरणीच्या वेळेस हेक्टरी 40-60 कि. ग्रॅ. स्फुरद बियाण्याच्या खाली सहा ते दहा सें.मी. खोलीवर दिल्यास फायदा होतो.
संकलित!
खरीप हंगामात पेरणीयोग्य पाऊस पडल्यावर वाफसा येताच पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास जिवाणू संवर्धन चोळावे, यामुळे जमिनीतून उद्भवणा-या विविध रोगांपासून पिकाचे संरक्षण होते.
तुरीच्या पेरणीसाठी जून महिन्याचा पहिला पंधरवडा योग्य असतो. पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी (45 सें.मी. पेक्षा अधिक खोल), पाच-सात सामू असलेली जमीन या पिकासाठी योग्य असते.
तुरीचे पीक सुरवातीच्या काळात (30 ते 40 दिवस) अतिशय सावकाश वाढते, त्यामुळे सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. या काळात जमिनीत हवा खेळती ठेवणे आवश्यक असते. पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली आणि त्यानंतर 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. तुरीचे पीक पेरणीपासून 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवल्यास उत्पादनात वाढ होते.
तुरीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आय.सी.पी. एल-87, ए.के.टी.-8811, विपुला, टी विशाखा-1, बी.डी.एन-2, बी.एस.एम.आर-736 बी.एस.एम. आर-853 या सुधारित जातींचा वापर करावा.
Comments
Post a Comment