सूक्ष्म सिंचन अनुदान १००% नाही, राज्य शासनाचा वाटा १००% आहे!!
सूक्ष्म सिंचन अनुदान १००% नाही, राज्य शासनाचा वाटा १००% आहे!!
सकाळ पासून अनेक ग्रुप मधे ड्रिप ला १००% अनुदान हा मेसेज फिरतोय. हे *साफ चुक आहे.*
नुकतीच महाराष्ट्र शासनाने मराठवाडया करीता विशेष सूक्ष्म सिंचन योजना जाहिर केली. यात पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेनुसारच अनुदान मिळणार आहे.
अवर्षण प्रवण क्षेत्रा करीता अल्प व अत्यल्प भूधारकां करीता ६०%,
बहुभुधारकांसाठी ४५% अनुदान असेल. याशिवाय अवर्षण प्रवण क्षेत्रा बाहेरिल अल्प व अत्यल्प भूधारकां करीता ४५%, बहुभुधारकांसाठी ३५% अनुदान असेल. म्हणजे कोनालाच १००% अनुदान नाही ( फुकट ड्रिप नाही).
मग १००% काय आहे?
मित्रांनो शेती करिताच्या योजनां मधे केंद्र शासन काही वाटा उचलते, राज्य शासन काही वाटा असतो आणि कधी कधी काही वाटा लोकवाटा म्हणून द्यावा लागतो. इतर सूक्ष्म सिंचन योजनां मधे केंद्र शासन ५०% किंवा त्यापेक्षा कमी वाटा उचलत आहे आणि उर्वरित महाराष्ट्र शासन अदा करते.
नुकतीच जाहिर केलेली मराठवाड्या करिताची विशेष सूक्ष्म सिंचन योजना मात्र १००% राज्य शासन पुरस्कृत आहे. म्हणजे यासाठीचे पूर्ण आर्थिक तरतूद फ़क्त राज्य शासना मार्फ़त केली जात आहे. यात केंद्राचा कसलाच वाटा नाही.
त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित करू नका. योजनेचा चुकीचा अर्थ काढू नका.
अधिक माहिती करीता सोबत दिलेली शेकरु मधील इमेज पहा.
धन्यवाद!
संकलित!
Comments
Post a Comment