2,4-डी चा कपाशी वर डी लक्षणे, दक्षता व उपाययोजना!

2,4-डी चा कपाशी वर डी लक्षणे, दक्षता व उपाययोजना!

2,4-डी कपाशी वर दिसणारी लक्षणे
2,4-डी वापर करण्यापूर्वी काही दक्षता
2,4-डी दुष्परिणाम झाल्यास करावयाच्या उपाययोजना♥प्रगतशील शेतकरी♥

♥2,4-डी कपाशी वर दिसणारी लक्षणे

2,4-डी या तणनाशकाची फवारणी केलेल्या फवारणी पंपातून कीडनाशकांची फवारणी कपाशी पिकावर केल्यास
कपाशीची पाने लांबट होणे,
शिरांची दोरीसारखी उभट वाढ होणे,
पाने पिरगळून वाकडी होणे,
पानांचा आकार बदलणे,
आकसून येणे, शेंडे आकसणे ही लक्षणे दिसून येतात.
त्यामुळे फवारणी करताना काही गोष्टींचे पालन करून योग्य दक्षता घ्यावी.

♥2,4-डी वापर करण्यापूर्वी काही दक्षता

2,4 डी या तणनाशकाची शिफारस एकदलवर्गीय पिकांमध्ये मुख्यतः द्विदलवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी केली आहे. त्याचा वापर करण्यापूर्वी काही दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या टिप्स...

1) कपाशी व इतर द्विदलवर्गीय पिकांच्या शेजारी ज्वारीत किंवा मका किंवा उसामध्ये 2,4-डीची फवारणी करताना वारा शांत असेल याची काळजी घ्यावी, जेणे करून कपाशी व इतर द्विदलवर्गीय पिकांवर (उडीद, सोयाबीन इ.) ते उडून जाणार नाही.

2) 2,4-डीची फवारणी केलेल्या पंपातून कीटकनाशकांची फवारणी कपाशी पिकावर केल्यास पाने लांबट होणे, शिरांची दोरीसारखी उभट वाढ होणे, पाने पिरगळून वाकडी होणे, पानांचा आकार बदलणे, आकसून येणे, शेंडे आकसणे ही लक्षणे दिसून येतात.

3) तणनाशकाचा फवारणी पंप केवळ तणनाशकांच्या वापरासाठीच वापरावा, त्यातून कीटकनाशकांची फवारणी करू नये.
दुसरा पंप उपलब्ध नसल्यास 2,4-डी किंवा इतर तणनाशक फवारण्यापूर्वी व फवारणीनंतर तो पंप साबणाच्या किंवा अमोनिया द्रावणाने चार वेळा स्वच्छ धुऊन घ्यावा व नंतरच वापरावा.

4) एकदलवर्गीय पिकांमध्ये 2,4-डीची फवारणी काळजीपूर्वक करावी.
अशावेळी नॅपसॅक फवारणी पंप वापरावा, तसेच फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेड नोझल वापरावे. फवारणी करताना हूडचा वापर करावा.
जेणेकरून 2,4-डीचा फवारा किंवा त्याचा अंश उडून इतर (आजूबाजूच्या) पिकांवर किंवा कपाशी पिकांवर उडून जाणार नाही.
पॉवर स्प्रेचा अजिबात वापरू नये.

5) 2,4-डी हे तणनाशक आम्ल, सोडिअम क्षार, अमाईन क्षार व ईस्टर अशा चार संयुगाच्या स्वरूपात आढळते.
सोडिअम क्षार व अमाईन ही दोन्ही संयुगे पाण्यात विरघळणारी तसेच वातावरणात उघडी राहिली तरीही त्याची वाफ होत नाही.
तर ईस्टर हे संयुग पिवळसर रंगाचे असून, उघड्यावर राहिल्यास त्याची वाफ होते व हवेत उडून जाते.
त्यामुळे 2,4-डी ला बळी पाडणाऱ्या व अतिशय संवेदनशील असणाऱ्या टोमॅटो, द्राक्ष, कपाशी यांच्या शेजारी असलेल्या पिकावर ते फवारू नये.
कारण वाऱ्याची दिशा बदलल्यास त्याच्यापासून निघणारी वाफ शेजारच्या पिकांस घातक ठरते.

6) मका, ज्वारी किंवा ऊस यांसारख्या पिकांमध्ये 2,4-डी वापरताना ते शिफारशीत मात्रेत, शिफारशीत वेळी व शिफारशीत पद्धतीने वापरावे. जेणेकरून त्या पिकानंतर त्या जमिनीत पुढील वर्षी कपाशी किंवा इतर द्विदलवर्गीय पिकांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.

2,4-डी दुष्परिणाम झाल्यास करावयाच्या उपाययोजना♥प्रगतशील शेतकरी♥

♥ 2,4-डी झालेले दुष्परिणाम कमी करण्यासाठी
100 मि.लि. चुन्याची निवळी (10 टक्के) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावी.

♥ तसेच 100 ते 150 ग्रॅम या प्रमाणात 13:0:45 किंवा डीएपी किंवा युरिया प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

♥ बरोबर सूक्ष्म मूलद्रव्याचा (फवारणीतून द्यावयाचा) 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावा.

♥ 2,4-डी पानातून व मुळ्यांतून शोषले जाते.
ते झाडांतून वहन होऊन झाडाच्या शेंड्यात साठते.
त्यामुळे झाडाच्या वाढीला प्रतिबंध होतो.
अशा वेळी प्रादुर्भावग्रस्त झाडांचे शेंडे काढून टाकावीत.
जेणेकरून नवीन येणारे पाने व फुटवे यांच्यात 2,4-डी चा अंश कमी होऊन पुढे होणारे नुकसान कमी करता येईल.

♥ कपाशीमध्ये 2,4-डीचा दुष्परिणाम झाल्यास तो शंभर टक्के भरून येऊ शकत नाही.
परंतु कपाशीवर उडून आलेल्या 2,4-डी चे प्रमाण व कपाशीचे वय यानुसार काही प्रमाणात नुकसान भरून येऊ शकते.

(वरिल शिफारस स्वजबाबदारीवर वापरावी)

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!