मका सोलणी यंत्र
मका सोलणी यंत्र ♥प्रगतशील शेतकरी♥
♥मक्याची कणसे लांबट आणि देठाकडून शेंड्याकडे निमुळती होत गेलेली असतात.
कणसांची लांबी साधारणतः 15 ते 30 सें. मी. आणि व्यास मध्यावर 6 ते 8 सें. मी. असतो. कणसावर टपोरे दाणे कोंदणात बसविल्याप्रमाणे ओळीने एकमेकांशेजारी घट्ट बसविलेले आढळतात.
आडव्या बाजूने दाण्यावर जोर दिल्यास दाणे सहजपणे निखळतात आणि एकदा दाण्याची ओळ निघाल्यानंतर कणसापासून दाणे सुटे करण्यास फारसा त्रास होत नाही.
♥पारंपरिक पद्धतीत दाणे लहान प्रमाणावर हाताने सोलूनच काढतात किंवा काठीने बदडून दाणे मोकळे करतात.
हाताने मका सोलण्यास श्रम आणि वेळही बराच लागतो. तसेच हाताच्या बोटांना फोडही येतात.
हे काम लहान प्रमाणात सहज करता यावे, यासाठी एक साधे मका सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.
हे यंत्र म्हणजे 6.5 सें. मी. व्यासाचा आणि 6.5 सें. मी. लांबीचा लोखंडी पाइपचा तुकडा असून या पाइपच्या आत लोखंडी दातेरी पट्ट्या वेल्डिंग करून बसविलेल्या असतात. मक्याचे वाळलेले कणीस पाइपमध्ये घालून फिरविले, की दाणे निखळून पडतात.
एकावेळी अर्ध्या कणसावरचे दाणे काढून झाले, की दाणे निघालेला भाग हातात धरून दाणे राहिलेला भाग यंत्रात घालून फिरवावा.
अशा पद्धतीने मक्याचे मूळ कणीस न फुटता त्यावरील दाणे सहज काढता येतात.
♥यंत्राची वैशिष्ट्ये
या यंत्राची रचना अगदी साधी असल्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीतून खेड्यातील कारागीरही यंत्र तयार करू शकतो.
आकाराने लहान व वजनाने हलके, त्यामुळे हातात सहजपणे, जास्त श्रम न पडता धरता येते.
आठ तासांत साधारणपणे दोनशे कि. ग्रॅ. कणसे सोलून होतात.
लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी, श्रम कमी करणारे आणि वेळेची बचत करणारे असे हे यंत्र आहे.
♥अधिक माहीतीसाठी
प्रमुख संशोधक,
कृषी अवजारे व यंत्रे योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
राहुरी, जि. अहमदनगर,
पिन कोड नं. 413 722
फोन नं. - 02426 - 243219/243140
संकलित!
Comments
Post a Comment