पशुविमा घेण्याआधी काही महत्वपूर्ण माहिती

पशुविमा घेण्याआधी काही महत्वपूर्ण माहिती♥प्रगतशील शेतकरी♥

♥विम्यासाठी  कोणत्या जनावरांसाठी किती वय आवश्यक आहे याची माहिती खालीलप्रमाणे

दुधाळ गाय (देशी/संकरित) -
३ वर्षे (अंदाजे पहिल्या वेताचे वय) ते १० वर्षे व

दुधाळ म्हशी
४ वर्षे (अंदाजे पहिल्या वेताचे वय) ते १२ वर्षे,

इतर जनावरे -

शेळी, मेंढी, डुकरे व ससे

१ ते ६ वर्षे व

इतर पाळीव प्राणी जसे घोडा, गाढव, खेचर, उंट, बैल, वळू, रेडा -

२ ते १२ वर्षे.
------------------------------------------------------------------------------------

♥पशुविमा मुदतीत जनावर विकल्यास विमा हस्तांतरण बद्दल माहिती खालीलप्रमाणे

विमा उतरविलेले जनावर पशुपालकाने विमा मुदतीत विक्री केल्यास/हस्तांतरित केल्यास सदर विमा नवीन लाभार्थ्यांस हस्तांतरित करता येतो.

पण हस्तांतरणाच्या कार्यवाहीसाठी दोन्ही पशुपालकाच्या विनंती अर्जावर स्थानिक शासकीय पशुवैद्यक/ उपायुक्त, पशुसंवर्धन यांच्या प्रमाणिकांची व प्रतिहास्तातरण शुल्क पशुपालकाकडून आकारले जाते.

या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी पशुपालकांनी जवळच्या पशुधन विकास अधिकारी
(श्रेणी - १) यांच्याकडे संपर्क साधावा.

सेवाकर लागू असल्यास सेवा रक्कम ही संबंधित लाभार्थ्याला भरावी लागते.
-------------------------------------------------------------------------------------------------
♥बऱ्याच पशुपालकांमध्ये विम्यासंदर्भातील माहितीचा अभाव व अज्ञान जाणवते.

जनावरांना विम्याचे संरक्षण दिल्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळता येते.

पशुंच्या विम्याबाबत आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे व तितकेच महत्त्वाचेदेखील...
-----------------------------------------------------------------------
♥पशुविम्यामध्ये संरक्षण कुठल्या कारणासाठी मिळते यासंबधी माहिती खालीलप्रमाणे

१) जनावरांना झालेले विविध प्रकारचे आजार (लाळ्या खुरकूत, घटसर्प, फऱ्या, पोटफुगी, गोचीड, ताप, तीवा).

२) अपघात (आग, पूर, वादळ, वीज पडणे) तसेच सर्पदंश, शस्त्रक्रिया इ.

३) जनावरांच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या दुर्घटना/ अपघाताचा विमाही करता येतो.

४) गाभण जनावरांच्या गर्भाचादेखील विमा करता येतो.

५) कायमस्वरूपी व पूर्णतः अपंगत्वापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण ज्या फायद्यासाठी जनावर पाळतो, तो फायदा आपल्याला त्या जनावरापासून मिळत नसल्यास अतिरिक्त असे विमाशुल्क भरून आपण अपंगत्वाचे संरक्षण करू शकतो.
--------------------------------------------------------------------------------------------
♥पशुविमासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात त्यासंबंधी माहिती खालीलप्रमाणे

१) विहित नमुन्यातील अर्ज.

२) जनावर निरोगी व सुदृढ असल्याचे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेच्या नोंदणीकृत पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र.

३) जनावराचा फोटो ज्यामध्ये (रंग, शिंगे, आकार, शेपूट) इ. सर्व दिसेल अशा वर्णनाचा फोटो.

४) जनावर खरेदी केल्याची खरेदी पावती तसेच या व्यतिरिक्त संबंधित विमा कंपनीच्या दाव्यासाठी अनुभव लक्षात घेऊन अजून काही बाबी गरज असल्यास आवश्यक ठरू शकते.

५) जनावरांच्या कानाला बिल्ला मारणे.
--------------------------------------------------------
सरकारी पशुविमा कंपन्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती खालीलप्रमाणे

१) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

२) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.

३) न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

४) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.

या सरकारी विमा कंपन्या शक्यतो पतसंस्था, दूध संघाबाबत गट व बँकेमार्फत कर्जाने दिलेल्या जनावरांचा विमा करून घेतात. याशिवाय काही खासगी विमा कंपन्याही अाहेत.

खासगी विमा कंपन्या बिनकर्जाच्या/स्वतःच्या मालकीच्या असलेल्या तसेच कर्जाऊ जनावरे या दोन्हींचा विमा करतात.
--------------------------------------------
♥पशुविम्याचा दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात यासंबंधी माहिती खालीलप्रमाणे

विमा केलेले जनावर दगावल्यास किंवा त्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विम्याची रक्कम मिळण्याकरिता पुढील काही कागदपत्रे व गोष्टींची पूर्तता करावी लागते.

जनावराचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास पशुपालकाने विमा कंपनीला लगेचच माहिती द्यावी.

सदर मूर्त जनावराचा शवविच्छेदन अहवाल नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून करून घ्यावा.

कंपनीचा विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज व मूळ विमा पॉलिसी जवळ ठेवणे.

मृत जनावराचा शवविच्छेदन करण्यापूर्वी व केल्यानंतरचा फोटो यामध्ये जनावरांच्या अंगावरच्या खुणा दिसतात असा फोटो.

पशुवैद्यकाने पशुवर केलेल्या उपचाराचा सविस्तर दाखला.

जनावर कायमस्वरूपी अपंग झाले असल्यास तसा पशुवैद्यकाकडून घेतलेला दाखला.

पंचनाम्याचा अहवाल, यावर ग्रामसेवक/सरपंच व पाच पंचांच्या सह्या व शिक्के असणे आवश्यक आहे.

जनावरांचा पशुपालकासह काढलेले छायाचित्र तसेच फक्त जनावराचे छायाचित्र यामध्ये कानातील बिल्ला स्पष्टपणे दिसून येईल.

सर्वांत महत्त्वाचे मृत पशुच्या कानातील बिल्ला, सुस्थितीत कंपनीला परत करणे आवश्यक असते.

वरील सर्व बाबींची पूर्तता केल्यावर विमा कंपनीचे अधिकारी अथवा त्यांनी नेमणूक केलेला पशुवैद्यक स्वतः येऊन तपासू शकतात.

विम्याच्या दाव्याची रक्कम त्या मृत जनावराची जात, वय, प्रकृती, दुग्धोत्पादन क्षमता गर्भारपणाची अवस्था व आजारी पडण्यापूर्वीची बाजारातील योग्य किंमत विचारात घेऊन ठरविली जाते.

मृत जनावराच्या विमा दाव्याची रक्कम ही आश्वासित केलेल्या रकमेएवढी व

कायमस्वरूपी पूर्णतः अपंगत्व आलेल्या जनावराला आश्वासित रकमेच्या ७५ टक्के रक्कम मिळेल.
---------------------------------------------------------------------------------
♥पशुविम्यासाठी मर्यादा काय असतात याविषयी माहिती खालीलप्रमाणे

विम्याद्वारे काही बाबींपासून पशुविम्याचे संरक्षण मिळत नाही.

जनावर चोरी झाल्यास पशुविमा मिळत नाही.

जाणूनबुजून जनावराला इजा पोचविल्यास विमा मिळत नाही.

विम्याचा लाभ घेण्यासाठी विमा केलेल्या जनावराकडे व त्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास.

आजारी जनावरास अयोग्य पद्धतीने उपचार करणे.

एखाद्या भागात जनावराला साथीचा आजार पसरत असेल किंवा कायमस्वरूपी आढळत असेल तर विमा संरक्षण मिळत नाही.
-----------------------------------------------------------------
♥पशुविमा नाकारल्या जाऊ शकणाऱ्या बाबी खालीलप्रमाणे

विमा केलेल्या जनावराच्या कानात लावलेला बिल्ला आपणास कंपनीला व्यवस्थित परत करावयाचा असतो. तो हरवल्यास विमा कंपनी नाकारते.

जनावराच्या कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी वा तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या तसेच अंशतः वा पूर्णतः अपंगत्वासाठी कंपनी विमा संरक्षण देऊ शकत नाही.

जनावरांचा विमा करावयाचा असेल ते निरोगी व सुदृढ असावे.
कारण विमा केलेले जनावर पॉलिसी सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मरण पावले असल्यास कंपनी विमा नाकारते.

कृपया वर  दिलेली माहिती आपल्या फेसबुक वर, फेसबुक पेज आणि ग्रुपवर तसेच व्हाट्स अँप ग्रुप वर शेअर करावी, हि माहिती जरी तुमच्या उपयोगी नसेल तरी ती तुमच्या मित्राच्या उपयोगी पडू शकते. खाली दिलेल्या क्रमांकावर sms, नाव, जिल्हा  करून आपला प्रगतशील शेतकरी ग्रुप जॉईन करता येईल.
9422895411

संकलित!

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!