जनवारांसाठी घरगुती उपचार पेटी
जनवारांसाठी घरगुती उपचार पेटी
♥जनावरांचे आजार व औषधी वनस्पती
मानवाप्रमाणेच प्राण्यानांही विविध प्रकारचे आजार संभवतात, ब-याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतो व यासाठी प्रामुख्याने औषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो. असे उपचार करत असतांना प्रत्यक्ष पशुवैद्यकाची गरज भासत नाही, परंतु अचुक रोगनिदान व औषधोपचार या संबंधी पशुवैद्यकाचा सल्ला आवश्यक आहेच. याशिवाय विशिष्ट रोग व त्यावरील उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत. काही प्राथमिक आजार व उपचार यांची माहीती पशुपालकास असणे आवश्यक आहे.
♥जनावरांचे सर्वसाधारण आजार व त्यावरील प्राथमिक उपचार यासाठी डॉक्टर जसे स्वत:जवळ विविध औषधांचा साठा ठेवतात त्याचप्रमाणे पशुपालकाने देखील एक प्राथमिक उपचार पेटी ठेवावी व यात जनावरांच्या विविध आजारात उपयुक्त असलेल्या वनौषधींचा साठा ठेवावा यामुळे जनावरास अचानक उद्भवलेल्या आजाराच्या वेळी पशुपालकाची धावपळ होणार नाही. पशु आजारात औषधी वनस्पतीच्या प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी पशूपालकाने खालील बाबीने विचार करावा.
१) औषधी वनस्पतीच्या वापर करम्यापूर्वी या लेखात सांगितलेल्या व आपण वापरात असलेली वनौषधी एकच आहे याची खात्री करावी.
२) वनस्पतींची ओळख पटल्यानंतर औषधात वापरण्यापूर्वी ती स्वच्छ करावी. वाळलेली, किडलेली वनौषधी वापरू नये.
३) या लेखात सांगितलेली मात्रा ही आजाराच्या तिव्रतेनूसार बदलू शकते.
४) तोंडावाटे द्यावयाची औषधी विशेषत: जी औषधी पाण्यासोबत पाजावयाची आहे ती पाजतांना कोमट पाणी वापरल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.
५) या लेखात दिलेल्या औषधी १०० ग्रॅम च्या स्वरूपात दिलेल्या आहेत. प्राथमिक उपचार पेटीत साठा ठेवत असतांना पशुपालकाने आवश्यतेनूसार साठा ठेवावा.
६) या लेखात मोठे जनावर म्हणजे गाय, म्हैस व लहान जनावर म्हणजे शेळी मेंढी हे होय.
पचनसंस्थेचे आजार
अ) तोंड येणे, तोंडखुरी :
हळद - १५, कोरफळ – ५, जेष्ठमध – ४, अर्जुन साल – १०, कात – २, तुळस – ५, जखमजोडी – ५, कडुलिंब तेल – ४, गेरू – ५ सर्व औषधी बारीक करून त्यात पाणी मिसळून त्याचा लेप तोंडात द्यावा.
आ) पोट गच्च होणे : हिरडा – ३०, आवळा – २०, एरंडतेल – २०, मुरडशेंग – १५, सोनामुखी – १५
वरील सर्व वनस्पती बारीक मोठ्या जनावरांत १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
इ) पोटफुगी :
ओवा – २०, धणे – १०, जिरे – १५, बडीसोप – १०, हळद – १५, काळे मिठ – ३० या सर्व वनस्पती बारीक मोठ्या जनावरात २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
ई) पोटदुखी :
पिंपळी – ५, जिरे – १५, सुंठ/ अद्रक – २०, ओवा -३०, चित्रक – ५, काळेमिरे – ५, वावडींग – १०, हिरडा- २०
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
उ) अन्न न खाने :
चित्रक – ५, पिंपळी – ५, सुंठ/ अद्रक – १०, आवळा – २०, जिरे – १०, ओवा – १०, काळे मिठ – २५.
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
ऊ) अतिसार (हगवण) :
कुडा – ३०, बेल – २०, डाळींबसाल – २०, कात – ५, बाभळीचा डिंक – २५.
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
♥श्वसनसंस्थेचे आजार :
अ) सर्दी, खोकला, ठसकणे :
१) अडुळसा – ३०, तुळस – २०, कंटकरी – १०, काळे मिरे – १०, सुंठ / अद्रक – १०, कासणी – २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
२) कापुर -४, पुदिना – ५, निलगिरी तेल – २०, विंटरग्रीनतेल – २०. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात वरील तेलाचे ५-१० थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.
प्रजननसंस्थेचे आजार
अ) जनावर माजावर न येणे : कोरफड – २०, बांबु पाने – २०, गोखरू – १५, हिसबोळ -१०, अशोक – २०, तगर – ५, उलटकंटल – १०.
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस तीन दिवस द्यावी.
आ) गर्भ न राहणे : दुर्वा – २५, कमळ बी – २५, शिंगाडा – २५, पुत्रंजीव – २५
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २० ग्रॅम जनावर लावल्या पासून दोन महिन्यापर्यत तर लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस २० दिवसापर्यत खाद्यातून द्यावे.
इ) मायांग बाहेर पडणे : जटामासी – २०, रानहळद – १०, जेष्ठमध – १०, कुठ – ५, लोध्र – ३०, अश्वगंधा – १०, कंकोल – १५.
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २०-३० ग्रॅम व लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.
ई) जार न पडणे : ईश्वरी -२०, कलोंजी – २०, तांब – १०, कळलावी मुळ – १०, कापूस ( मुळची साल ) – १५, सतापा – १०.
वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत ३०-४० ग्राम द्यावे.
संकलित!
Comments
Post a Comment