नाती Relatives
नाती Relatives || आई- वडील|| *सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर. || *गुरुजन* || आपल्या भविष्याचे शिल्पकार आपल्या जीवनाचा प्रकाश अज्ञान दूर करणारे वासरमणी मानवतेचे महादूत. || *आजी - आजोबा* || आपले जीवन फुलविणारे माळी आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती. || *सासू - सासरे* || आपल्याला जन्म न देणारे आईवडील पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप. || *काका - मावशी* || आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिता विशुध्द भावाचे चिंतामणी. || *आत्या - मामा* || वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती. || *मामा* || मानवी जीवनाचं एक मनोरम नातं जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो मा + मा =