॥ श्रीब्रह्मचैतन्य स्तोत्र ॥ Shri Brahma Chaitanya Strotra ...
॥ श्रीब्रह्मचैतन्य स्तोत्र ॥ पुण्यशील कुणि वारकरी कुळ नांदे गोंदवले गावी । आले गेले घर भरलेले कीर्ती त्यांची सांगावी ॥ १ ॥ गावावरूनी वाट चालली थेट पोचली पंढरिसी । त्या वाटेवर उभे राहिले घर हे उघडे सर्वांसी ॥ २ ॥ घर हे कसले हे तर मंदिर येथे पंढरिनाथ उभा । उणे न येथे कशास काही हीच पंढरी ती शोभा ॥ ३ ॥ माण नदीचा माणदेश हा रुक्ष दिसाया डोळ्यांना । अमाप भक्ती पीक दाटले दिसे प्रेमळा भक्तांना ॥ ४ ॥ त्या गावीचा पांडुरंग हा कुळकर्णी लिंगोपंत । रखुमाईही धर्मचारिणी झाली आई गावास ॥ ५ ॥ थकली काया शिणली गात्रे पाय न चालत वय झाले । आता कोठली घडणे वारी लिंगोपंता मनि आले ॥ ६ ॥ तोच बोलला स्वप्नी येउन पांडुरंग कटि हात उभा । खंत कशाला करिसी भक्ता मळ्यात ये मी तेथ उभा ॥ ७ ॥ खणता भूमी येई हाती रखुमावर त्या मातीत । म्हणे घरी चल घेउन मजसी मीच आलो तुज शोधीत ॥ ८ ॥ अशा घराची सून साजिरी बाला गीता प्रिय गावा । सासुसासर्या देव मानिले देई आनंदा सर्वा ॥ ९ ॥ अतिथी यात्रिक अथवा साधू येवो दारी दिनी निशी । वंदन करणे अन्न घालणे सांभाळी कुळरीत अशी ॥ १० ॥