हरभरा मर व हुमणी नियंत्रण असे कराल
हरभरा मर व हुमणी नियंत्रण असे कराल♥प्रगतशील शेतकरी♥ ♥रोगाच्या नियंत्रणासाठी ज्या शेतात नेहमी रोपांची मर होत असते त्या शेतात हरभरा लागवड करु नये. इतर ठिकाणी लागवडीपुर्वी बियाण्यास रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया करावी. ♥मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे. ♥मर रोगाला कारणीभुत बुरशी फायटोप्थोरा ज्या जमिनीत जमिन कोरडी झाल्यानंतर तडे पडतात अशा जमिनीत या रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. या रोगाची लागण बुरशी सारख्याच Phytophthora medicaginis उमायसिटी या गटातील सुक्ष्मजीवा मुळे होते. या रोगाची लागण रोपाच्या कोणत्याही अवस्थेत जसे बाल्यावस्था, वाढीचा काळ, फुलोरा अवस्था, फळ धारणा या सर्वच अवस्थात होते. रोप मलुल होवुन मरते, पाने पिवळी पडतात. रोगाची लागण झाल्यानंतर जर हवामान थंड असेल आणि जमिनीत पाणी असेल तर रोगाची लक्षण दिसण्यास काही कालावधी लागतो. रोपाच्या मुळांची वाढ होत नाही, मुळांची संख्या कमी असते, तसेच रोपाची वाढ खुंटते. फायटोप्थोरा जमिनीत उस्पोअर्स च्या स्वरुपात अग