आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात ... live in harmony

भारतात
इंग्रज आले ,
फक्त
१७९

नंतर
१००० झाले ,

नंतर
१०,०००

आणि

नंतर
१,००,००० झाले

आणि

या एक लाख इंग्रजांनी आपल्या
३० करोड
जनतेवर राज्य केले.

कसे बर शक्य झाले ???

कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
केला होता
आणि
त्यांनी एक निष्कर्ष
काढला जो आजही 2016 सालीही लागू होतो ,

तो म्हणजे भारतीय लोकांना

जाती-भेद,
धर्मभेद,
गरीब-श्रीमंत,
प्रांत भेद
या गोष्टीनमध्ये
पेटवायचे मग हे

३० काय ३०० करोड
जरी झाले तर
कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत ...

कारण....

ते एकमेकांनाच कापत बसतील
पण कधीही एक होऊ
शकणार नाहीत .

एवढा द्वेष मनामध्ये भरेल.

मी मराठा
मी धनगर
मी चांभार
मी कुंभार
मी मांग
मी महार
मी ब्राम्हण
मी माळी
मी आमुक आणि मी तमुक .....

.... झालं यातच
आम्ही
आमचे श्रेष्ठत्व मानतो.

( मीञांनो ६७४२ जाती आहेत)

आज आम्ही एवढे मोठे झालो आहे
की....
..... थोर युग
पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही..

सावरकर
ब्राह्मणांचे झाले,

बाबासाहेब आंबेडकर
दलितांचे ,

छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,

मल्हारराव होळकर धनगारांचे.

महात्मा ज्योतीराव फुले माळ्याचे.

आणाभाऊ साठे मातंगाचे ..

जाता
जात नाही
ती जात

इंग्रजांनी केली वाताहत।

आपण बनवले गेलो हातोहात,

आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।

पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोणाचेतरी गुलाम बनुन जगा ॥

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!