श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्र ...
श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥
॥ श्री मारुतिस्तोत्र.... भीमरूपी महारुद्रा
👉भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
👉वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
👉महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
👉सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥
👉दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
👉पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
👉लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
👉पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
👉ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
👉काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥
👉ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
👉नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
👉पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
👉सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
👉ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
👉चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
👉कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
👉मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
👉आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
👉मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥
👉अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
👉तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥
👉ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
👉तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
👉आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
👉वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
👉धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
👉पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
👉भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
👉नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
👉हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
👉दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥
👉रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
👉रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥
🎁॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥
॥ श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥🎁
समर्थ रामदास
Comments
Post a Comment