प्रभू श्रीराम.. 'आपण ज्याला सोडाल तो तरेल कसा? बुडेलच! '
प्रभू श्रीराम.. 'आपण ज्याला सोडाल तो तरेल कसा? बुडेलच!’
सेतू बांधायचे काम सुरू होते. दगडावर रामनाम लिहिले असता ते तरू लागले.
एका रात्री श्रीराम स्वत: तेथे गेले. तेथे कोणीच नव्हते.आपले नाव लिहिताच दगड तरतात, तर आपण स्वहस्तेसोडलेले दगडसुद्धा तरतील, या विचाराने श्रीरामांनी एक दगड घेऊन पाण्यात सोडला. तो बुडाला....
श्रीरामांनी आजूबाजूला पाहिले. ही फजिती पाहायला कोणीच नव्हते. श्रीरामांनी दुसरा दगड घेऊन हळूच पाण्यात सोडला. तोसुद्धा बुडाला.
एवढ्यात हसण्याचा आवाज कानी आला. प्रभूंनी पाहिले, तर हनुमान हसताना दिसले.
“तू केव्हा आलास?’ रामांची पृच्छा.
“प्रभू, जेथे तुम्ही तेथे हा सेवक,’ हनुमान उत्तरले.
“म्हणजे तू सर्व पाहिलेस तर!’ श्रीराम म्हणाले. “होय प्रभू,’ हनुमानानेकबूल केले.
“हनुमंता, मला एक सांग, माझे नाव लिहिलेले दगड तरतात; पण मी स्वत: सोडलेला दगडमात्र बुडतो, हे कसे?’ श्रीरामांनी विचारले.
“प्रभू, या सेवकाची परीक्षा पाहत आहात? तरीही उत्तर देतो.
दगडसुद्धा ज्याच्या नावामुळे तरतात, असे आपण आहात.
त्यामुळे आपण ज्याला सोडाल तो तरेल कसा? बुडेलच!’ हनुमंत म्हणाले.
या उत्तराने प्रभु श्रीराम आनंदित झाले।
राम
Comments
Post a Comment