15 जानेवारी - नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे To be in Nama is to be Really on Senses ...

Discourses by Shri Brahma Chaitanya Gondavalekar Maharaj -

१५ जानेवारी - नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे.

दारूड्यांच्या मेळाव्यात सारेच धुंदीत असतात. पण त्यांतला एखादा दारू न प्यालेला असला तर बाकीचे दारूडे त्याला 'हा शुध्दीवर नाही' असे म्हणत असतात. वास्तविक तोच एकटा शुध्दीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने, जो नामात असतो त्याला आपण 'हा शुध्दीवर नाही' असे म्हणत असतो. वास्तविक पाहता, 'नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही' अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो, व आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरा सत्संगती, आणि तिसरा नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सद्‌विचार. एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये, तर त्याला येता येणार नाही; कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव हे असणारच. त्याचप्रमाणे नाम, संत, आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत, त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतलेकी भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का, असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल, तर त्याचे उत्तर सोपे आहे. असे यंत्र संतांनी केव्हाचशोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे 'रामनाम.' हे यंत्र सर्वांना मिळू शकते, सर्वांना वापरता येते, शिवाय ते कधीच गंजत नाही.भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत. जिथे नाम आहे तिथेभक्त आहे, आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वांत श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या. नाल्यातून, गटारातून पाणी वाहते, ते किती घाण असते ! पण तेनदीला मिळते आणि ती सागराला मिळते. सागर त्या सर्वांना सागररूपकरून टाकतो. तसे मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या, त्याने नामनदीची कास धरली की तो रामसागररूप झालाच म्हणून समजा. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरणहोते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. अनाथ शब्द नाथावाचून नाही, आणि नाथाला अनाथावाचूननाथत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणातआपण राहू या. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दु:खे कस्पटाप्रमाणे वाटतील.

तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हांला संत धुंडीत जाण्याची जरूरीच नाही, तेच तुम्हांला धुंडीत येतील

English Translation

To be in Nama is to be Really on Senses

In a party of drunkards, all are inebriated. If, however, there is one who is not, the rest say, ‘he is not on his senses’, though actually he is the only one who is really on his senses. Similarly, because we are all absorbed in the enjoyment of sensuous pleasures, we say a person absorbed in nama is not in his right mind. Actually it is he who is on his senses, while we are under an illusion.
The illusion we are labouring under can be removed by three means; namely, good thoughts, good company, and nama-smarana. Thought about the divine is the only good thought. If a man is asked to come minus his limbs and complexion, he will not be able to do it, because they are an inseparable part of him: so, too, nama, the saint, and God are inseparable from one another. Where there is nama, there, too, are the saint and the divinity. Just as the cow follows when you take her calf away, God will follow if you chant the nama. One may ask why the saints have not devised a machine for reaching the divinity; the answer is that they have long ago invented one which is available to any one, can be used safely by any one, and never rusts or breaks down; it is Rama-nama.
The devotee, the divinity, and the nama are identical with one another. Where there is nama there will be found the devotee and the divinity. Therein lies the greatness of nama. Let us keep uttering it with undivided attention. The dirty water in the gutters and ditches joins the river which flows into the sea, and becomes indistinguishably one with it. Similarly, however sinful and cuplable a man may be, if he joins the river of nama he will definitely merge into the ocean Rama. To forget the Creator is an unparalleled sin. Nama maintains awareness of God and thereby washes away all sin.
The word anatha (destitute) postulates the existence of a natha (protector); the one cannot exist without the other. Rama is the protector of all. Let us be in unceasing remembrance of Him. Worldly life is like the life of a person banished to the woods, away from home. One would think light of the trials and tribulations of worldly life if one lives in remembrance of Rama.

Comments

Popular posts from this blog

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती

लागवडीचे अंतराप्रमाणे एकरी किती झाड बसतील ह्याचे गणित असे कराल!